Girl Kidnapped अपहरण झालेली 'ती' मुलगी आई-वडिलांच्या स्वाधीन !

श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील हरेगाव फाटा (Haregoan Fhata) ठिकाणावरून एका तरुणाने पाच वर्षीय सावत्र बहिणीस फूस लावून पळवून नेले होते. मात्र कुठल्याही प्रकारे पुरावा, मोबाईल संपर्क तसेच धागेदोरे नसतानाही श्रीरामपूर शहर पोलीस (Shrirampur Police) स्टेशनचे अशोकनगर (Ashik Nagar) पोलीस चौकी कर्मचारी यांनी कार्यतत्परता दाखवत अपहरण झालेली मुलगी काही तासांतच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आईच्या स्वाधीन केली. त्यामुळे पोलिसांच्या कार्यतत्परतेचे कौतुक केले जात आहे.
श्रीरामपूर हरेगाव फाटा तालुक्यातील परिसरातील झोपडी या ठिकाणावरून गणेश अशोक घाडगे या तरुणाने स्वतःची सावत्र बहीण (वय ५) या छोट्या बालिकेस फूस लावून पळवून नेले. मुलीची आई झोपडीमध्ये आल्यावर मुलगी घरात नाही तसेच सावत्र मुलगा गणेश अशोक घाडगे हा देखील दिसत नसल्याने सदर महिलेने परिसरात शोधाशोध सुरू केली. त्यानंतर या महिलेने हरेगाव फाटा पोलीस निवारा कक्ष याठिकाणी माहिती दिली.

यावरून पोलीस नाईक किरण पवार यांनी घटनेची माहिती पोलीस निरीक्षक संजय सानप तसेच पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे यांना दिली. पोलीस नाईक किरण पवार तसेच पोलीस मित्र गणेश गायकवाड यांनी वैजापूर, कोपरगाव याठिकाणी माहिती घेतली सदर तरुणाकडे मोबाईल नसल्याने तपासामध्ये मोठी अडचण निर्माण होत होती.
येथील गृहरक्षक दलाचे राजेंद्र देसाई यांनी मोबाईलवरून सदर तरुणाचे मुलीचे गाडीचे फोटो व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून प्रसार माध्यमामधून सर्वत्र पाठवले. यावेळी सदर आरोपी हा कोपरगाववरून नाशिककडे जात असताना पोलिसांना माहिती मिळाली. तसेच नाशिककडे जात असताना सदर तरुणाची गाडी नाशिक जिल्ह्यातील वावी पांगरी या ठिकाणी बंद पडल्याने त्याने सदर गाडी रोडवर उभी करून सदर मुलीस गाडीजवळ बसविले व त्या ठिकाणावरून त्याने अन्य वाहनाने नाशिककडे पलायन केले.
या अवस्थेमध्ये रस्त्यावर मुलगी रडत असल्याने पांगरी येथील पोलीस मित्र शांताराम वारुळे यांनी सदर मुलीबाबत चौकशी करत घरी नेऊन मुलीस जेऊ घातले. या घटनेची माहिती पत्रकार शंतनु कोरडे यांना देण्यात आली. यावेळी मोबाईलवर सदर तरुणाबाबत असलेली माहिती पडताळणी झाली. यावरून पत्रकार कोरडे यांनी हरेगाव फाटा पोलीस निवारा कक्ष येथे संपर्क केला यावरून पोलीस कॉन्स्टेबल तुषार गायकवाड, गृहरक्षक दलाचे राजेंद्र देसाई तसेच अपहरण झालेली मुलीची आई मुलीला घेण्यासाठी पांगरी या ठिकाणी पोहोचले. या ठिकाणी सापडलेली पाच वर्षीय लहान मुलगी ताब्यात घेत आईच्या स्वाधीन केली. मुलीला पाहताच आईच्या जिवात जीव आला.

यावेळी श्रीरामपूर पोलीस स्टेशनच्यावतीने पोलीस मित्र शांताराम वारुळे तसेच पत्रकार शंतनू कोरडे यांचे आभार मानण्यात आले. यावेळी श्रीरामपूर शहर पोलिसांनी कार्यतत्परता दाखवत अपहरण झालेली मुलगी काही तासांतच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आईच्या स्वाधीन केली. यावेळी सरपंच आबासाहेब गवारे यांनी तसेच मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी पोलीस नाईक किरण पवार, पोलीस कॉन्स्टेबल तुषार गायकवाड, राजेंद्र देसाई, पोलीस मित्र गणेश गायकवाड, श्री. बनकर यांचे कौतुक करत सन्मान करणार असल्याची माहिती दिली