E Peek Pahani maharashtra - रब्बी ई पीक पाहणीला झाली मुदतवाढ, बघा किती आहे शेवटची तारीख आणि कशी करायची ई पीक पाहणी?

शेतकरी मित्रांना तांत्रिक कारणांमुळे E Peek Pahani ई पीक नोंदणी करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेता पीक पाहणी नोंदणीला 15  मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

यामध्ये आता शेतकऱ्यांना आपल्या शेतातून१५ मार्च पर्यंत हंगाम निहाय पिकाची नोंदणी अक्षांश-रेखांशासह काढलेल्या पिकाच्या छायाचित्रासह ई पीक पाहणी App मध्ये अपलोड करावी लागणार आहे. 


त्या नंतर पुढच्या स्टेप मध्ये आवश्यक असल्यास काही दुरूस्ती करून तलाठी ती पीक पाहणी नोंदणी कायम करतील. 


खातेनिहाय पिकांची माहिती संबंधित डिजिटल स्वाक्षरीत 7/12 मधील गाव नमुना नंबर 12 मध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचा वापर विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी करता येणार आहे तसेच पीक कर्जासाठी देखील याचा फायदा शेतकर्‍यांना होणार आहे. 
या e peek pahani साठी शेतकऱ्यांना आपल्या मोबाईल मध्ये e peek pahani application ईपीक पाहणी मोबाईल ॲप download करायचे आहे.


येथून  E Peek Pahani Download करावे. 




हे  E Peek Pahani App गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ई- डाऊनलोड करून त्यावर शेतकर्‍याची नोंदणी करावी लागेल. 


त्या नंतर पीक पेरणीची माहिती या सदरामध्ये जमिनीचा भूमापन क्र./सर्व्हे नं /गट क्रमांक निवडावा. 7/12 

जमिनीचा गट क्रमांक निवडाल त्यावेळी तुमच्या जमिनीचे एकूण क्षेत्र व पोट खराबा याबाबत सर्व माहिती दाखवली जाईल.

त्या नंतर हंगाम निवडामध्ये खरीप किंवा संपूर्ण वर्ष या पैकी हंगाम निवडू शकता.

पीक पेरणीसाठी (लावणीचे) उपलब्ध क्षेत्र दर्शविले जाईल.

पिकांच्या वर्गामध्ये एक पीक पद्धती, मिश्र पीक, पॉलीहाउस पीक, शेडनेटहाउस पीक, पड क्षेत्र यापैकी योग्य पर्याय निवडावा.

जमीन मिळकतीमध्ये निर्भेळ पीकांची नोंद करण्यापूर्वी जमिनीत कायम पड क्षेत्र असल्यास, प्रथम कायम पड जमिनीची नोंदणी करावी.

पीकांचा वर्ग निर्भेळ पीक निवड केल्यानंतर निर्भेळ पीकाचा प्रकार पीक व फळपीक पर्याय दिसतील. त्यातील योग्य पर्याय निवडावा.

पीक पर्याय निवडून शेतातील पीकाचे नाव निवडून क्षेत्राची नोंद करावी. फळपीक पर्याय निवडल्यास फळ झाडांची संख्या व क्षेत्र नमूद करावे.
मिश्र पीक निवडल्यानंतर पिके आणि क्षेत्र नमूद करावे. मिश्र पिकाचे क्षेत्र नमूद करताना त्यातील घटक पिकाने व्यापलेल्या क्षेत्राचे प्रमाणात विभागून टाकावे. त्यातील घटक पिकांच्या क्षेत्राची बेरीज एकूण क्षेत्रापेक्षा जास्त होवू नये.

चालू हंगामामध्ये जमीन शेत पिकाखाली येत नसल्यास किंवा लागवड केली नसल्यास अशावेळी चालू पड क्षेत्र निवड करावे.

जल सिंचनाचे साधन पर्यायाखाली पिकांना पाणी देण्यासाठी ज्या सिंचन साधनाचा उपयोग करत आहात तो पर्याय निवडता येईल.

त्यानंतर सिंचन पद्धत निवडायची आहे. ठिबक सिंचन, तुषार सिंचन, प्रवाही सिंचन किंवा अन्यप्रकारे यापैकी एक पर्याय निवडणे अपेक्षित आहे.

शेतकरी या ठिकाणी पीक पेरणी केलेला/लागवड केलेल्या पीकांचा दिनांक नमूद करतील.


E Peek Pahani ई पीक नोंदणी करताना काही अडचण आल्यास किंवा मदत हवी असल्यास आपल्या कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.