नाशिक जिल्ह्यातील निफाड गावातील महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्येच हा प्रकार घडला. अनेकदा कॉलेजमध्ये अशा छोट्या-मोठ्या मारामाऱ्या होतच असतात. नाशिकमधील विद्यार्थ्यांच्या हाणामारीचे व्हिडीओ समोर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही शहरातील नामांकित महाविद्यालयात दोन युवतींमधील फ्री स्टाईल जोरदार चर्चेत होती.
विद्यार्थ्यांनी एकमेकांना तुडव-तुडव तुडवल
सुरुवातीला झालेल्या वादावादीनंतर दोन गटांमध्ये फ्री स्टाईल फायटिंग सुरु झालेली. त्यानंतर काही जणांनी एकमेकांना अक्षरशः तुडव-तुडव-तुडवल्याचे पाहायला मिळाले. कुठल्या मुलीला प्रपोज करण्यावरुन वाद झाला, की अन्य कुठल्या कारणावरुन, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
तसेच कुठल्या विद्यार्थ्याला यात गंभीर दुखापत झाली आहे का, याबाबतही माहिती मिळालेली नाही. परंतु कॉलेजमध्येच विद्यार्थ्यांमध्ये इतकी मारामारी झाल्यामुळे महाविद्यालयातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या घटनेचा व्हिडीओ काही जणांनी इन्स्टाग्राम अकाऊण्टवर शेअर केले आहेत. हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे.
#ViralVideo : दे दणा दण! प्रपोस डे ला वाद; नाशिकच्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या दोन ग्रुपमध्ये 'फ्री स्टाईल' : सविस्तर बातमी वाचण्यासाठी https://t.co/bCNvGElgA1 ला भेट द्या!#ValentinesDay #ProposeDay2022 #Nashik #Nasik #Niphad #Maharashtra #प्रपोस_डे #महाराष्ट्र #नाशिक #निफाड pic.twitter.com/H5qmb3gg4H
— इ खबरबात l eKhabarbat (@ekhabarbat) February 9, 2022