पुण्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांकडून धक्काबुक्की; चक्क पायऱ्यांवर कोसळले!


 पुणे महानगरपालिकेत आलेल्या भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना शिवसेनेकडून धक्काबुक्की करण्यात आली आहे. या झटापटीत सोमय्या हे पायऱ्यांवर कोसळले. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांना पाहून किरीट सोमय्या यांनी आपला पुण्यातील कार्यक्रम रद्द करत महापालिकेतून काढता पाय घेतला. 
कोविड सेंटरच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत यासंदर्भातील चर्चेसाठी किरीट सोमय्या हे पुणे महापालिकेत आले होते. मात्र यावेळी पुणे महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराचे निवेदन स्वीकारावे, अशी मागणी करत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची वाट अडवली. यावेळी शिवसैनिकांनी प्रचंड गोंधळ घातला. झटापटीत किरीट सोमय्या चक्क पायऱ्यांवर कोसळले.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आक्रमक भूमिका पाहून सोमय्या यांच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना गाडीत बसवत गाडी पुढे नेली. यावेळी गाडीलाही गराडा घातला गेला होता.

दरम्यान, या घटनेनं पुण्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं असून भाजप आणि शिवसेनेत तणाव निर्माण झाला आहे