चर्मकार, नाभिक व खाटीक , बांधवांच्या भावना दुखावनाऱ्या सोशल मीडियावरील या टिप्पणीमुळे संदीप जोशी हा इसम मनुवादी आणि जातीवादी असल्याचे स्पष्ट होते व त्याची विचारसरणी अत्यंत घाणेरडी असल्याचे यातुन स्पष्ट झाले असल्याने त्याच्यावर तातडीने ॲट्रॉसिटी कायद्यानुसार कार्यवाही करावी या मागणीसाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे उत्तर विभागाचे अध्यक्ष दिलीपराव कानडे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव येथे निवेदन देण्यात आले.
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्या आदेशानुसार राज्यभरात अशा प्रकारे निवेदन देत कार्यवाही न झाल्यास तिव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य तथा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव कानडे, युवा जिल्हाध्यक्ष दत्तात्रय दुशिंग, जिल्हा सचिव संजय पोटे, युवा जिल्हा सचिव संजय सरवार उपजिल्हाध्यक्ष देविदास कानडे,
पै.बाळासाहेब वानखेडकर, तालुका अध्यक्ष माधवराव पोटे, युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष तुषार पोटे, राज्य कार्यकारणी सदस्य एम. डी कानडे, शहराध्यक्ष गणेश कानडे, संतोष कानडे, संकेत कानडे, संतोष दळवी, संतोष बारसे, संतोष शिंदे, सागर पोटे, संकेत कानडे आदी समाज बांधव व पदाधिकारी उपस्थित होते.