कोपरगाव तालुक्यातील 'या' गावात रहस्यमयी कारणाने तरुणाचा मृत्यू

कोपरगाव तालुक्यातील पूर्वेस असलेल्या कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या शिवारात रात्रीच्या सुमारास झारखंड हाजीराबाद जोघी सिमरा येथील तरुण सोहन युगुल भासके (वय-२२) याच्या डोक्यावर अज्ञात कारणाने प्रहार झाला असून त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.या बाबत पोहेगाव येथील पर्यवेक्षक शिवलिंग पुंजाजी गायकवाड (वय-४१) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
कोकमठाण हद्दीत महावितरणच्या पारेषण विभागाचे टॉवर उभारिणीचे काम सुरु आहे.सदरचे काम वेगाने सुरु असून त्या ठिकाणी मयत तरुण हा काम करण्यासाठी झारखंड येथून आपल्या साथीदारांसह आला होता.तो आपले काम आटोपून घरी जात असताना काही तरी अज्ञात कारणाने त्यास डोक्यावर जोरदार प्रहार झाला असून त्यात तो मृत्युमुखी पडला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी हा पोहेगाव येथील रहिवासी असून कोकमठाण हद्दीत महावितरणच्या पारेषण विभागाचे टॉवर उभारिणीचे काम सुरु आहे.सदरचे काम वेगाने सुरु असून त्या ठिकाणी मयत तरुण हा काम करण्यासाठी झारखंड येथून आपल्या साथीदारांसह आला होता.तो आपले काम आटोपून घरी जात असताना काही तरी अज्ञात कारणाने त्यास डोक्यावर जोरदार प्रहार झाला असून त्यात तो मृत्युमुखी पडला आहे.त्यामुळे त्याच्या डोक्यातून मोठा रक्तस्राव झाला आहे.दरम्यान या घटनेने कोकमठाण व कोपरगाव तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात शिवलिंग गायकवाड यांनी आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास खबर दिली आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.12 सी.आर.पी.सी.१७४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे करीत आहेत.