सविस्तर वृत्त असे की
औरंगाबाद जिल्ह्यात पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा करून फरार झालेला भगवान भोसले या आरोपीच्या मागावर कोपरगाव व औरंगाबाद पोलीस होते.दरम्यान तो आपल्या मूळ गावी आला असल्याची गुप्त खबर कोपरगाव तालुका पोलिसांना लागली.
त्या खबरीच्या आधारावर त्यांनी आज पढेगाव येथे छापा टाकला आणि त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यास पुढील कार्यवाहीसाठी औरंगाबाद पोलिसांकडे सोपवले आहे.