Daal Mill Yojna कोपरगाव तालुका डाळ मिल अनुदान योजना लाभार्थी यादी : 1 लाख 25 हजार अनुदान



कमी भांडवल उभारणीतही सर्व प्रकारच्या डाळी तयार करण्यासाठी मिनी दाल मिल संयंत्राची निर्मिती करण्यात आली आहे. 

हे संयंत्र ग्रामीण स्तरावर घरगुती उद्योग म्हणून स्वयंरोजगारास उत्कृष्ट आहे.

कड धान्याचे डाळी मध्ये रुपांतर करण्यासाठी दाल मिल उद्योग हा चांगले पैसे मिळवून देणारा व्यवसाय आहे.

आज आपण डाळ मिल अनुदान बाबत खलील गोष्टींची माहिती घेणार आहोत. 
 

1. महाराष्ट्र शासनाच्या डाळ मिल योजनेचा लाभ कुणाला घेता येइल ? 

उत्तर -शेतकरी/महिला गट यांना. 

2. दाल (डाळ ) मिल साठी अर्ज कसा करावा

दालमिल योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करता येईल


3. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे 

शेतकर्‍यांसाठी कागदपत्रे

    7/12
    8 अ
    आधार कार्ड
    बँक पासबुक

महिला बचत गटांना सुरवातील अर्ज करताना बचत गटाचे प्रमाण पत्र लागेल नंतर निवड झाल्यावर कृषी विभागाच्या मागणी प्रमाने कागदपत्रे द्यावे लागेल 

4. निवड कशी केली जाते 
ऑनलाइन अर्ज केल्यावर महाराष्ट्र शासनाकडून ऑनलाइन सोडती द्वारे लाभार्थी निवड केली जाते. निवड झाल्यावर लाभर्थ्याला आवश्यक कागदपत्रे आपलोड करावी लागतात. त्यानंतर पूर्वसंमती पत्र दिले जाते. 

5. अनुदान किती मिळते 

अर्थ साह्य

 राष्ट्रीय अन्न सुरक्षा कडधान्य अंतर्गत प्रत्यक्ष खर्चाच्या ६० टक्के किंवा कमाल रु.१. २५ लाख अनुदान देय आहे.


तसेच कृषि यांत्रिकीकरण उप अभियान अंतर्गत अनुदान मर्यादा खालीलप्रमाणे आहे.
अल्प/अत्यल्प/महिला/अजा /अज भूधारक - प्रत्यक्ष खर्चाच्या ६० टक्के किंवा कमाल १. ५० लाख
बहू भूधारक - प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल १. २५ लाख 

कोपरगाव तालुका डाळ मिल अनुदान लाभार्थी निवड यादी