‘थेरगाव क्वीन’सोबत हवा करणाऱ्या ‘भाई’ची हवा टाईट; पोलिसांसमोर जोडले हात - बघा व्हिडिओ




सोशल मीडियावर झटपट प्रसिद्धीसाठी थेरगाव क्विनने (Thergaon Queen) इंस्टाग्रामवरुन अनेक व्हीडिओ शेअर केले. या प्रकरणी वाकड पोलिसांनी स्वंयघोषित थेरगाव क्विनसह एकूण तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली होती. दरम्यान या प्रकरणात नवी अपडेट आली आहे. या प्रकरणी फरार असलेल्या आणखी एका सहकाऱ्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. 
पोलिसांनी फरार असलेल्या कृणाल कांबळेला अटक केली आहे. पोलिसांनी आपला अवतार दाखवताच या तरुणाने माफी मागितली. अशी थेरं पुन्हा कधी करणार नाही, असा माफीनामा त्याने लेखी लिहून दिला.

वाकड पोलिसांनी काही दिवसांपूर्वी स्वंयघोषित 'थेरगाव क्विन' अर्थात साक्षी श्रीश्रीमाळ, साक्षी कश्यप आणि या दोघांना आधीच अटक केली होती. मात्र कुणालला चाहूलला लागताच तो फरार झाला होता. अखेर पोलिसांनी या तरुणाच्या मुसक्या आवळल्या.
झटपट प्रसिद्धीसाठी ही तिकडी सार्वजनिक ठिकाणी व्हीडिओ बनवायचे. या व्हीडिओमध्ये अश्लील संवाद आणि शिव्या असायच्या. थेरगाव क्विन या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन हे व्हीडिओ व्हायरल केले जायचे. संतापजनक म्हणजे हे असे व्हीडिओ अनेक जण पाहायचे. धक्कादायक म्हणजे कुमारवयीने मुलं या थेरगाव क्विनला फॉलो करतात. इतकच नाही, तर मोठी माणसंही या थेरगाव क्विनचे व्हीडिओ शेअर करुन या अपप्रवृत्तीला हातभार लावायचे.

अखेर या तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यामुळे आपणही एक जागृक नागरिक म्हणून कोणाचं समर्थन करतोय किंवा काय पाहतोय, याची जाण ठेवायला हवी, जेणेकरुन या अशा प्रवृत्ती फोफावण्यास वाव मिळणार नाही.