तर दि.३० मार्च रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादी व साक्षिदार घरासमोर असताना साक्षिदार गणेश भरती यास आरोपी दीपक निकम याने काठीने मारहाण केली आहे व अन्य आरोपी शोभा विनायक निकम,विनायक धोंडिबा निकम सर्व रा.संजीवनी कारखाना व अन्य इतर चार अनोळखी इसम यांनी गणेश भरती यास मारहाण केली असल्याची फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे की,
फिर्यादी महिला हि कासली येथील रहिवासी असून आरोपी दीपक निकम व अन्य दोन आरोपी हे संजीवनी कारखाना येथील रहिवासी आहेत.त्यांच्यात काही कारणाने वाद आहेत.दरम्यान दोन दिवसापूर्वी सदर फिर्यादी महिला हि आपल्या कासली येथील शेतात गट क्रमांक १५९(३) मध्ये आपल्या कांदा पिकाची खुरपणी करत असताना आरोपी दीपक निकम हा त्या ठिकाणी आला व त्याने फिर्यादी महिलेचा हात धरून तिला उद्देशून म्हणाला की,”तू खूप सुंदर दिसतेस असे म्हणून अक्षम्य बोल लावले आहे”असे म्हणून फिर्यादिस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे.
तर दि.३० मार्च रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादी व साक्षिदार घरासमोर असताना साक्षिदार गणेश भरती यास आरोपी दीपक निकम याने काठीने मारहाण केली आहे व अन्य आरोपी शोभा विनायक निकम,विनायक धोंडिबा निकम सर्व रा.संजीवनी कारखाना व अन्य इतर चार अनोळखी इसम (गाव माहिती नाही) यांनी गणेश भरती यास मारहाण केली व शिवीगाळ करून दमदाटी केली आहे.या प्रकरणी फिर्यादी महिलेने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.क्रं.११३/२०२२ भा.द.वि.कलम ३५४,३२४,३२३,५०४,५०६,१४३,१४७,१४८,१४९ प्रमाणे सात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.आर.एम.म्हस्के हे करीत आहेत.