दहावी उत्तीर्णांसाठी नोकरीची चांगली संधी आहे. नवी मुंबई इथल्या टपाल विभाग विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. विमा प्रतिनिधी, विमा क्षेत्र अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. त्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. लक्षात ठेवा अर्ज हा ऑफलाईन पद्धतीनं करायचा आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2022 पर्यंतची आहे.
पदाचे नाव – विमा प्रतिनिधी, विमा क्षेत्र अधिकारी.
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार (मूळ जाहिरात डाऊनलोड करून पहावी)
अनुभव – उमेदवारांना विमा क्षेत्रातील कोणत्याही कंपनीत काम करण्याचा अनुभव असावा तसंच संगणकाचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. विशेष बाब म्हणजे सरकारी विमा विभागातून सेवानिवृत्त झालेले कर्मचारीही या पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत.
वयोमर्यादा
विमा प्रतिनिधी – उमेदवाराचे वय 18 पेक्षा कमी आणि 50 पेक्षा जास्त नसावे.
विमा क्षेत्र अधिकारी – 18 पेक्षा कमी आणि 65 पेक्षा जास्त नसावे
कोणकोणती कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज पाठवण्याचा पत्ता
वरिष्ठ अधीक्षक, नवी मुंबई विभाग, वाशी मुख्य पोस्ट ऑफिस बिल्डिंग, तळमजला, हिंदुराव पाटील मार्ग, सेक्टर 16, वाशी 400703
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 फेब्रुवारी 2022