Boyfriend Burnt Alive बॉयफ्रेंड ला घरच्या लोकांच्या मदतीने मुलीने केला रॉकेल टाकून पेटवले !

नाशिक जिल्ह्यात प्रेमसंबंधामधून एका तरुणाला जिवंत जाळल्याची घटना समोर आली आहे. या हृदयद्रावक घटनेत एका तरुणीने आपल्या प्रियकरालाच आपल्या कुटुंबासोबत षडयंत्र रचून जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत तरुण 55 टक्के भाजला असल्याचं समोर आलं आहे.
नेमकी घटना कशी घडली..?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवळा तालुक्यातल्या लोहनेर येथील गोरख बच्छाव या 31 वर्षीय युवकाचे मालेगाव जवळच्या रावळगाव येथील युवतीशी प्रेमसंबंध होते. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध होते, आणि त्यांनी लग्न करण्याचाही निर्णय घेतला होता. पण त्या युवतीचे लग्न तिच्या घरच्या मंडळींनी आपल्या पसंतीच्या व्यक्तीशी करण्याचा निर्णय घेतला. मात्र जे स्थळ तिला आलं होतं, त्यांना कदाचित तिच्या प्रेम प्रकरणाची माहिती मिळाली असेल म्हणून तिचं लग्न मोडलं गेलं, असा अंदाज व्यक्त होत होता.
मग फक्त संशय होता आणि आरोप करण्याचं बाकी काम राहिलं होतं. मग या तरुणीच्या घरच्या लोकांचा संयम सुटला आणि रागाच्या भरात त्यांनी गोरख बच्छावला शिवीगाळ केली. गोरखने स्वतःला सिद्ध करताना सांगितलं की, ‘तरुणीचं लग्न मोडण्यात माझा काहीच संबंध नाही आणि आपण आजही तिच्याशी लग्न करण्यास तयार आहोत’, असं सांगितलं. त्या युवतीच्या घरच्यांनी ‘तू लोहनेर येथे थांब आम्ही पंचायतजवळ आलो’, असे सांगून वाद बोलून मिटेल असं गोरखला वाटलं आणि त्याला आपल्या जाळ्यात हळूहळू त्यांनी गुंतवलं.
पण ठरलेल्या ठिकाणी पोहचण्याआधी तरुणीचाही राग निघण्यास सुरुवात झाली आणि तिने गावातील एका दुकानातून रॉकेल विकत घेतलं. ठरल्याप्रमाणे गोरख बच्छाव मंदिराजवळ आला आणि मुलगी, तिचे आई, वडील आणि दोन भावांनी “मुलीचं लग्न का मोडलं”, असा जाब विचारला आणि मग बोलतानाच गोरखवर सपासप वार केले. मग व्हायचं ते झालंच, शेवटी ती तरुणी आणि गोरख यांच्यात जे प्रेमसंबंध होते त्याला तरुणीने काळिमा फासला आणि तिने विकत घेतलेले रॉकेल गोरखवर फेकून, आगपेटीची काडी ओढून त्याच्या अंगावर फेकली. यात गोरख भाजला असून त्याची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान गोरख हा स्वतःच्या बचावासाठी येथील एक दुकानात घुसताना हा प्रकार घडला. गोरख नामक या तरुणाला लोखंडी रॉड व काठीने मारहाणही केली असल्याचं स्थानिकांनी सांगितलं.
बघ्यांनी मात्र घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. गोरखला सुरुवातीला घटना घडल्यानंतर तातडीने पुढील उपचारासाठी देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते. देवळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेत गोरख 55 टक्क्यांहून अधिक भाजला असल्याने त्याच्यावर सध्या बनाशिकमधल्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी मुलगी, तिचे आई-वडिल आणि दोन भावांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.