नगर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर 'या' तालुक्याचा बोलबाला


जिल्ह्याचा विकास व राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या जिल्हा नियोजन समितीवर संसद व विधिमंडळ नामनिर्देशित सदस्य दोन, जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेले 4 तर सामान्यपणे जिल्हा समिती क्षेत्रातील निवासी असलेल्या 14 व्यक्तींसह विशेष निमंत्रित सदस्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यंदा या समितीवर उत्तर नगर जिल्ह्याला (12) अधिक संधी मिळाली आहे. तर दक्षिणेतील 8 मान्यवरांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या समितीत संसद व विधिमंडळ सदस्यांमधून नामनिर्देशित सदस्य खा. सदाशिव किसन लोखंडे, श्रीरामपूरचे आ. लहू नाथा कानडे यांची नियुक्ती केली आहे. तर जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेले नामनिर्देशित सदस्य म्हणून राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील तनपुरे समर्थक आणि मुळा धरण कृती समितीचे अध्यक्ष प्रभाकर रेवणनाथ गाडे यांना, श्रीरामपुरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश गोविंदराव आदिक, जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब दिघे यांना संधी देण्यात आली आहे. हर्षवर्धन अशोक बोठे (रा. वाळकी) यांचीही नियुक्ती केली आहे.

विशेष निमंत्रित सदस्यांमध्ये माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांचे चिरंजीव आणि शेवगाव पंचायत समिती सभापती डॉ. क्षितीज घुले पाटील (रा. शेवगाव)यांची, संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक तज्ज्ञ संचालक ऋषिकेश प्रतापराव ढाकणे यांची निवड करण्यात आली आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचनेवरून ऋषिकेश ढाकणे यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड करण्यात आली.
बाबासाहेब भिमाजी तरटे (रा. भाळवणी), अकोले तालुक्यातील समशेरपर येथील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि अमृतसागर दुध संघाचे माजी व्हा. चेअरमन पोपटराव गणुजी दराडे, कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे गटातील सदस्या सोनाली राहुल रोहमारे, प्रवीण विठ्ठल घुले (रा. कर्जत), संगमनेर तालुक्यातील पिंपळे येथील रहिवाशी, ना. बाळासाहेब थोरात समर्थक आर्किटेक इंजिनियर, वसंतराव नाईक पतसंस्थेचे चेअरमनबी. आर. चकोर, अकोलेतील अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, बुवासाहेब नवले पतसंस्थेचे संस्थापक, ना. बाळासाहेब थोरात यांचे खंदे समर्थक मधुकरराव नवले (काँग्रेस), जयंत रामनाथ वाघ (रा. अहमदनगर), कोपरगावातील शिवसेनेचे उत्तर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांचे चिरंजीव विशाल झावरे, संजय नारायण काशीद (रा. जामखेड), शरद मधुकर झोडगे (रा. नागरदेवळे), भागवत बाळासाहेब मुंगसे (रा. देवळाली प्रवरा ), अभिजीत भगवान खोसे (रा. बुरुडगाव रोड, अहमदनगर ) यांना समितीमध्ये स्थान मिळाले आहे.
समितीत श्रीरामपूरचा बोलबाला!

श्रीरामपूर तालुक्यातील उंबरगाव येथे राहणारे खा. सदाशिव लोखंडे, श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे तसेच राष्ट्रवादीचे नेते अविनाश आदिक, जि.प. सदस्य बाबासाहेब दिघे यांच्या रूपाने या समितीत चौघांना संधी मिळाली आहे. पहिल्यांदाच या समितीत श्रीरामपूरचा बोलबाला राहणार आहे