सविस्तर वृत्त :
फिर्यादी अल्पवयीन मुलगी हि कोपरंगाव शहरातील ब्रिजलाल नगर येथील रहिवासी असून त्याच भागातील आरोपी असलेला तरुणाने तिला आपल्या मारुती स्विफ्ट या कार (क्रं.एम.एच.१२ जे.यू.९२११) मधून शिर्डी व इतर ठिकाणी नेऊन त्या त्या ठिकाणी वेळोवेळी नेऊन तेथील राज लॉज येथे नेऊन तिचे मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेऊन तिच्यावर जातीवाचक शिक्कामारून तिच्या जातीचा तिच्या वर्तनाशी संबध जोडून उल्लेख करून तिने कोणाला काही सांगितले तर तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती.या संबंधी तिने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान घटनास्थळी शिर्डी येथील पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव,व पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी भेट देऊन घटनेचे गांभीर्य ओळखून कार्यवाही सुरु केली आहे.गुन्हा रात्री उशिरा ०८.४१ वाजता दाखल केला आहे.
कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.१४ /२०२२ भा.द.वि.कलम ३७६,५०६,पोक्सो कायदा कलम ४,८,१२ तसेच अनुसूचित जाती जमाती कायदा कलम ३(१) आर.एस.डब्ल्यू.प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव हे करित आहेत.