आमदार आशुतोष काळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

आमदार आशुतोष काळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

कोपरगाव प्रतिनिधी -: युवा उद्योजक राहुल सोनवणे यांच्या संकल्पनेतुन आ.आशुतोष काळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाला सामाजिक उपक्रमाची जोड देत, अनेक विविध सामाजिक उपक्रम देखील राबविण्यात आले. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी ब्राम्हणगावातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह आमदार आशुतोष काळे यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ब्राम्हणगांव येथे श्रावण तात्याआसने , विठ्ठलराव आसने ,उद्योजक राहुल सोनवणे ,रविंद्र पिंपरकर , भिकराज तांबे यांनी शाळेत लेझीम साहित्य, वृक्षरोपण व केक कापून आमदार आशुतोष काळे यांचा वाढदिवस साजरा केला.

यावेळी युवा उद्योजक राहुल सोनवणे, श्रावण आसने, भिकराज तांबे, रविंद्र पिंपरकर, तुकाराम हुळेकर ,किसन आहेर, गवारे मामा, गणेश आहेर, बाबासाहेब जगताप, गणेश बर्डे,अशोक बनकर, विशाल कुमावत, संजय साबळे, पांडुरंग सोनवणे, नानासाहेब सोनवणे, बंडू शिंदे ,सिताराम आहेर ,वाल्मीक जगधने, रवी डोळे ,समाधान दोडकर, विठ्ठल सोनवणे ,स्वप्निल बनकर, सचिन आहेर, पप्पू माळवदे, कार्तिक सोमासे, समर्थ अंबिलवादे, केशव ढोकणे ,रोहन कांबळे, केशव अंबिलवादे, मुख्याध्यापक झाल्टे सर व सर्व शिक्षक वृंद आदी ग्रामस्थ उपस्थित होते