महाराणा प्रताप यांचे स्मारक कऱ्हेकर समाज्यासाठी प्रेरणादायी!! चंद्रकांत वक्ते
कोपरगाव प्रतिनिधी -: राजपूत (कऱ्हेकर) समाजाचे दैवत वीर महाराणा प्रताप यांचे स्मारक उभारण्यात यावे यासाठी आ.आशुतोष काळे यांच्या मागणीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्यता दिली असून लवकरच वीर महाराणा प्रताप यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे.
कऱ्हेकर समाज्यासाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन चंद्रकांत वक्ते यांनी करून आ.काळे व अजितदादा पवार यांचे आभार मानले आहे.महाराष्ट राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काल दि.१० ऑगस्ट रोजी कोपरगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेत महिला मेळाव्यात महिला भगिनींशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी राजपूत (कऱ्हेकर) समाजाचे दैवत वीर महाराणा प्रताप यांचे स्मारक लवकरात लवकर उभारण्यात येईल अशी घोषणा केली. महाराणा प्रताप यांचे स्मारक व्हावे यासाठी आ.आशुतोष काळे प्रयत्नशील होते.