कोपरगाव तालुक्यातील मायगांव देवी येथे रेणुका (अंबाबाई) माता यात्रोत्सवास प्रारंभ

कोपरगाव तालुक्यातील मायगांव देवी येथे रेणुका (अंबाबाई) माता यात्रोत्सवास प्रारंभ

कोपरगाव प्रतिनिधी :- मोहन जाधव.मायगांव देवी कोपरगांव

दक्षिणगंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीकाठी कोपरगाव तालुक्यातील पश्चिमेस धामोरी, टाकळी रस्त्यापासून ३ किमी. अंतरावर वसलेले मायगाव देवी हे छोटेसे गाव. या गावचे पंचक्रोशीत जागृत देवस्थान या गावात आहे. ते म्हणजे श्री क्षेत्र अंबाबाई मातेचे देवस्थान हे अलौकिक अशा साडेतीन शक्तीपीठ याप्रमाणे जागृत असलेले हे देवस्थान आहे. पौराणिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले हे देवस्थान तीनही बाजूनी गोदावरी नदी असलेल्या व श्री अंबाबाई मातेचे देवस्थानच्या अनेक अख्यायिका व मंदिर स्थापनेविषयी कथा सांगितल्या जातात. देवी मुळे गावचे नाव ही मायगांव देवी असे पडले आहे असे जाणकार सांगतात.


कोपरगाव तालुक्यातील मायगांव देवी येथे सालाबादप्रमाणे, याही वर्षी यात्रोत्सव आयोजित करण्यात आला आहे. २५ एप्रिल ते ५ मे या कालावधीत श्री रेणुका (अंबाबाई) देवी यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील भाविकांनी देवीच्या दर्शनाचा तसेच यात्रेचा आनंद घ्यावा. तसेच मंगळवारी सकाळी ८ वाजेपासून श्री सप्तशृंगी वणी देवी गडापासून पासून आणलेल्या ज्योतीची भव्य मिरवणूक काढण्यात काढण्यात आली आहे. तसेच सायंकाळी तकतराव मिरवणूक काढण्यात मोठ्या उत्साहाने काढण्यात आली होती.

तरी सर्व भाविक भक्त व यात्रा प्रेमींनी यात्रा उत्सव आणि देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन गावचे सरपंच दिलीप शेलार आणि उपसरपंच मुकुंद गाडे,पोलीस पाटील संगीता ताजणे तसेच यात्रा कमिटी आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने आलेल्या सर्व भाविक भक्ताचे सहर्ष स्वागत करण्यात आले आहे.