ब्राम्हणगाव येथे साई चरित्र पारायण व संगीतमय साई कथा सुरू

ब्राम्हणगाव येथे साई चरित्र पारायण व संगीतमय साई कथा सुरू

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव येथे संदेश प्रतिष्ठाण व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि.१८/०४/२०२४ ते बुधवार दि.२४/०४/२०२४ या काळात साईचरित्र पारायण व साईसंगीतमय साई कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.संगीतमय साई कथाकार ह.भ.प अरुण महाराज रोहम यांच्या वाणीतून होत असलेल्या या सोहळ्याला पंचक्रोशीतील भक्त येत आहे.


दि २५/०४/२०२४ रोजी ह.भ.प बाळासाहेब महाराज रंजाळे यांचे काल्याचे किर्तन होईन महाप्रसादाचे आयोजन केले आहे.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साई संदेश प्रतिष्ठाण व ब्राम्हणगाव ग्रामस्थ परिश्नम घेत आहे