संपूर्ण राज्यात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटावून कामचुकारांची झोप उडवणारे व नियमाला धरुन काम करणारे प्रामाणिक अधिकारी म्हणून ज्यांची ख्याती आहे, असे बेधडक अधिकारी तुकाराम मुंडे यांची नुकतीच शिर्डी साईबाबा संस्थानच्या कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात
आल्याने शिर्डी साईबाबा संस्थानच्या मंदीर प्रशासनातील कर्मचाऱ्यासह मंदीराच्या नावाखाली चुकीची दुकानदारी करणाऱ्यांची झोप उडाली आहे. राज्यातील विविध
भागातील विविध विभागात धडाकेबाज काम करून शिस्तबद्ध नियोजन करणारे अधिकारी तुकाराम मुंडे यांची शिर्डी येथे नियुक्ती झाल्याने कही खुशी कही गम अशी अवस्था झाली आहे.
प्रशासकीय सेवेचा दांडगा अनुभव असलेले राज्याच्या आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची मंगळवारी शिर्डी देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
याबाबतचे आदेश राज्य सरकारने दिले असून शिर्डीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी असलेल्या भाग्यश्री बानायत यांची नागपूर या ठिकाणी बदली करण्यात आली आहे.
भाग्यश्री बानायत यांनी शिर्डी देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाल्या नंतर गेल्या दीड वर्षांमध्ये त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले होते. काही ठिकाणी ग्रामस्थ व प्रशासन यांच्यामध्ये दरी निर्माण झालेली होती,
त्यामध्ये मार्ग काढून शिर्डी देवस्थानचा कारभार कशा पद्धतीने चांगल्या करता येईल या दृष्टिकोनातून त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. देवस्थानामधली प्रशासकीय शिस्तही त्यांनी चांगल्या पद्धतीने लावली होती. त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता.