तालुक्यातील चासनळी येथील एका शेतातील सामायिक बांधावरील झाडे तोडण्याच्या कारणावरून दोन गटात झालेल्या तुंबळ भांडणात
काठ्या,दगड व लाथाबुक्यांचा सुकाळ होऊन त्यात फिर्यादी प्रमोद उत्तम फरताळे हे जखमी झाले
असून या गुन्ह्यात त्यांनी आरोपी सुनील भाऊसाहेब गाडे,शीतल रावसाहेब गाडे,प्रमोद भाऊसाहेब गाडे,प्रीतम रावसाहेब गाडे,
रावसाहेब रामराव गाडे सर्व रा.चास नळी आदी पाच जणांविरुद्ध गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.त्यामुळे चासनळी परिसरात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी प्रमोद फरताळे हे चासनळी येथील रहिवासी आहेत आणि ते शेती व्यवसाय करतात.
त्यांच्या शेजारी आरोपी सुनील गाडे यांची शेती आहे.
या दोघांचा सामायिक बांध आहे.
त्यावर काही झाडे आहेत ती मोठी झाली होती.
ती आरोपी सुनील गाडे व त्यांच्या काही नातलगांनी तोडली होती.
त्यावर फिर्यादी यांनी हरकत घेतली होती.
त्याचा राग येऊन आरोपी सुनील गाडे,
शीतल रावसाहेब गाडे,
प्रमोद भाऊसाहेब गाडे,
प्रीतम रावसाहेब गाडे,
रावसाहेब रामराव गाडे सर्व रा.चास नळी आदीनीं दि.०१ मे रोजी सकाळी ०८ वाजेच्या सुमारास बांबूच्या काठ्या,दगड व लाथा बुक्यांनी
मारहाण करत फिर्यादी प्रमोद फरताळे यांना जखमी केले. त्यामुळे या पाच जणांविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.