ब्राम्हणगाव येथे बालक-पालक मेळावा उत्साहात संपन्न

ब्राम्हणगाव येथे बालक-पालक मेळावा उत्साहात संपन्न

कोपरगाव प्रतिनिधी -: एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कोपरगाव मधील येसगाव बीट चा “आरंभ” अंतर्गत बालक – पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.मुलाच्या जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी ० ने ५ वर्षाचा कालावधी अंत्यत महत्वाचा समजला जात असतो. या काळात बालकाच्या मेंदूचा ८५% विकास होत असतो.हे लक्षात घेऊन बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी बौद्धिक, भावनिक, शारीरिक विकासासाठी मेळाव्यामध्ये खेळ कृती प्रदर्शन लावण्यात आले होते. यावेळी लहान मुलांना विविध खेळांची माहिती करून देत, त्यांना खेळ खेळण्यास प्रोत्साहन देण्यात आले व विविध स्टॉल या मेळाव्यात लावण्यात आले.भविष्याचे झाड मुखवटे विविध प्रकारच्या संवेदनशील पालकत्व स्पर्श दृष्टीने अनेक स्ट्रॉल लावण्यात आले

यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी पालकांना आपल्या भाषणात बोले की ,बालक घरामध्ये ठेवलेल्या साहित्यांसोबत जेव्हा खेळ खेळत तेव्हा तिथल्या नवीन साहित्याची त्याला। ओळख होते. तसेच खेळताना बालक विविध भूमिका निभावते त्यामुळे बालकाचा भावनिक आणि बौद्धिक विकास होतो खेळ घरातील खेळण्याद्वारे बालक जीवनामध्ये आवश्यक असलेले सर्व जीवन कौशल्य शिकू शकते. याची बालकाला पुढील आयुष्य जगताना मदत होते. समवयस्क बालकांबरोबर खेळल्यामुळे बालकाचा सामाजिक विकास सुद्धा उत्तम होतो तसेच बालक घरी सुद्धा घरातील साहित्यापासून खेळण्यासाठी प्रेरित होते आणि त्यामुळे बालकाचा सर्वांगीण विकास चांगला होतो. बालकाचा सर्वांगीण विकास विशेषतः भावनिक विकास उत्तम रीतीने घडून येण्यासाठी पालकांनी घरी आणि अंगणवाडी कार्यकर्तेने अंगणवाडीमध्ये बालकांना खेळ घरात खेळण्यास प्रोत्साहन द्यावे असे धुमाळ मॅडम यांनी सांगितले.

सदर कार्यक्रमास ब्राम्हणगावचे सरपंच अनुराग येवले बालविकास प्रकल्प अधिकारी धुमाळ मॅडम येसगाव गट पर्यवेक्षिका देवगुणे मॅडम तसेच माजी पंचायत समिती सदस्य श्रावण आसने ,माजी सरपंच बाळासाहेब आहेर ,माजी उपसरपंच शोभाताई बनकर, सदस्य रावसाहेब शिंगाडे, नाना जाधव, देविदास आसने, बाबासाहेब जगताप, नाना सोनवणे , येसगाव गट सर्व सेविका व मदतनीस ० ते ५ वयोगटाचे मुले ,पालक व ग्रामस्थ कार्यक्रमास उपस्थित होते