Viral Video : निर्मळ मनाची माणसं! नव्या दुचाकीऐवजी पत्नीलाच घातला हार, साधेपणा पाहून नेटकरीही भावूक

आपण भारतीय नागरिक अतिशय भावूक आणि धार्मिक प्रवृत्तीची माणसं आहोत. लहान लहान गोष्टींमध्ये आनंद शोधणे आपल्याला जमते. त्याचप्रकारे, प्रत्येक चांगल्या गोष्टीमध्ये आपण देवाचे आवर्जून आभार मानतो. इतकंच नाही, तर आपण फ्रिज, टीव्ही, गाडी अशा एखाद्या वस्तूची खरेदी केल्यावरही त्याला हळदकुंकू लावून, हार घालून नारळ फोडून त्यांचे स्वागत करतो. या क्षणी बहुतेक माणसे भावूकही होतात. सध्या सोशल मीडियावर एका जोडप्याचा नवी बाइक विकत घेतानाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये पतीने आपल्या पत्नीसोबत केलेल्या एका गोष्टीने सर्वांचंच मन जिंकलं आहे.

आयुष्याचा जोडीदार चांगला असेल तर माणूस कोणत्याही परिस्थितीवर अगदी सहज मात करू शकतो. आपल्या जोडीदारामुळे यशाचे शिखर गाठलेले अनेक लोक आपण आपल्या समाजात पाहू शकतो. माणूस गरीब असो वा श्रीमंत, जर त्याला चांगल्या जोडीदाराची साथ मिळाली, तर तो आयुष्यात कोणतेही ध्येय साध्य करू शकतो. हा व्हिडीओही याचेच एक उदाहरण आहे.

काळजावर दगड ठेवून अवघ्या तीन वर्षाच्या मुकबधीर मुलाला ट्रेनमध्येच सोडून गेली आई; चिठ्ठीमध्ये लिहिलं, “माझ्यासाठी…”

या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या इसमाने नवीन दुचाकी खरेदी केली आहे. गाड्यांच्या दुकानात तो आपल्या बायकोसह ही गाडी घ्यायला आला आहे. यावेळी दुकानदार या माणसाला गाडीला लावायला फुलांचा एक हार देतो. मात्र तो इसम हा हार आपल्या गाडीला न लावता आपल्या पत्नीच्या गळ्यात टाकतो. पत्नीला याबाबत काहीच कल्पना नसल्याने तिला काही क्षणासाठी धक्काच बसतो.

इसमाच्या या कृतीमधून त्यांने आपल्या पत्नीविषयीची कृतज्ञता व्यक्त केल्याचे आपल्या लक्षात येईल. पत्नी संपूर्ण आयुष्य कोणत्याही अपेक्षेशिवाय आपल्या पतीच्यामागे खंबीरपणे उभी राहते. मात्र बहुतेकवेळा तिच्या योगदानाकडे आणि तिच्या त्यागाकडे समाजाचे दुर्लक्ष होते. या व्यक्तीने आपल्या पत्नीचे महत्त्व ओळखून तिचा छोटेखानी सन्मान केला. त्याच्या या कृतीमुळे नेटकरी मात्र खूपच भावूक झाले असून या कृतीने त्यांच्या हृदयाला स्पर्श केला आहे.

शिस्त म्हणजे शिस्त…! मिझोरममधील रस्त्यावरचा दुचाकींचा हा फोटो बरंच काही शिकवणारा

व्हायरल होणार हा व्हिडीओ इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरही मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. ट्विटरवर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडीओला जवळपास ६ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकरी यावर आपल्या प्रतिक्रियाही देत आहेत.