संवत्सर येथे महाशिवरात्री निमित्ताने शृंगेश्वराय मंदिरात ह.भ.प.शिवाजी महाराज भालुकर यांचा किर्तनाचा सोहळा तसेच सांयाकाळी पाच वाजता शृगेंश्वर महाराज यांची पालखी सोहळा साजरा होत आहे.
यासाठी समस्थ ग्रामस्थ संवत्सर व पंच क्रोशीतील सर्व भाविक यांच्या सहकार्य लाभले आहे .
तसेच साला बाद प्रमाणे याही महा शिवरात्रीच्या निमित्ताने दिवसभर साई भक्तांकडून फराळ देण्याची व्यवस्था व पुण्यकर्म अविरत चालू असते.
महाशिवरात्री वर्षातून एकदा येणारा महत्वाचा प्रसंग आहे. यंदा १ मार्च २०२२ मंगळवार रोजी महाशिवरात्री असून, प्राचीन ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की, या दिवशी शिव तत्व (अव्यक्त दिव्यत्वाचे रूप) आपल्या भौतिक प्राप्तीसाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी पृथ्वीवर अवतरीत होते. म्हणून उपवास, मंत्रोच्चार, प्रार्थना आणि ध्यान करून महाशिवरात्री साजरी केली जाते.
जे महाशिवरात्रीला उपवास आणि साधना करतात त्यांना भगवान शिव आशीर्वाद देतात असे म्हणतात. काही पुराणांनुसार, माघ वद्य चतुर्दशीला भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता. म्हणून या दिवशी महाशिवरात्री साजरी करण्यात येते.
तसेच ह.भ.प. शिवाजी महाराज भालुकर व शिवाजी महाराज(शिवसेना तालुका प्रमूख कोपरगाव) ठाकरे यांचा आजच वाढदिवस साजरा केला जातो.
महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे, याविषयी तपशीलवार विवेचन विविध ग्रंथांतून आढळते.
माघ वद्य त्रयोदशीला एक वेळ भोजन करून रहावे, चतुर्दशीच्या दिवशी सकाळी व्रताचा संकल्प करावा आणि नंतर स्नान, शिवपूजा इत्यादी द्वारे व्रत पूर्ण करावे उपवास, पूजा व जागरण ही या व्रताची तीन प्रमुख अंगे आहेत.
रात्रीच्या चार प्रहरांपैकी प्रत्येक प्रहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शिवाची पूजा करावयाची असून तिला यामपूजा असे म्हटले जाते.
पूजा करताना शिवाला विशेष प्रिय म्हणून बेल, आंबा वगैरेंची पाने वाहिली जातात. विशिष्ट वर्षे व्रत केल्यानंतर त्याचे उद्यापन करता येते. या काळात उपवास, जागरण वगैरे गोष्टी नकळत घडल्या तरी व्यक्तीचा उद्धार होतो, अशी लोकांची श्रद्धा असून ती सूचित करणाऱ्या अनेक कथाही प्रचलित आहेत.
उदाहरणार्थ शिवरात्रीला नकळत उपवास घडल्यामुळे एका मृगाचा व व्याधाचा उद्धार झाला आणि त्यांना आकाशातील मृग व व्याध या नक्षत्रांचे रूप प्राप्त झाले.
महाशिवरात्रीला भारतातील काशी, रामेश्वरम्, गोकर्ण, वैजनाथ, शिखर-शिंगणापूर इत्यादी असंख्य शिवक्षेत्रांमधून यात्रा भरतात
कीर्तन व्हिडिओ
Kirtan Short Video