Leopard Mendhavan Captured मेंढवण मधील महिलेस ठार करणारा 'तो' बिबट्या जेरबंद

संगमनेर (Sangamner) तालुक्यातील मेंढवण (Mendhvan) येथील कारथळवाडी मध्ये महिलेस ठार करणारा  बिबट्या (leopard)  वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे, Leopard Captured 

हा बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

मेंढवण शिवारातील कारथळवाडी याठिकाणी दि. २१ फेब्रुवारी रोजी रात्री शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या हिराबाई एकनाथ बढे (वय ४५) यांचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय वनाधिकारी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर भाग दोनचे वनक्षेत्रपाल एस. एस. माळी, वनपाल पी. जे. पुंड, वनरक्षक एस. एम. पारधी, एस. बी. सोनवणे, व्ही. आय. जारवाल, वाहन चालक आर. आर. पडवळे, एस. बी. बोर्‍हाडे, वन कर्मचारी किसन काळे, अशोक गिते व ग्रामस्थांनी अहोरात्र गस्त करून नागरिकांमध्ये जनजागृती केली.
तर बुधवारी दि. २  पहाटे च्या सुमारास बाबुलाल पठाण यांच्या घराजवळ लावलेल्या पिंजर्‍यात भक्ष्याच्या शोधात आलेळा बिबट्या पिंजर्‍यात जेरबंद झाला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी  बिबट्यास निबांळे येथे नेले.

हा बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला

बिबट्या दिसला तर काय करावे?

दोन महत्वाच्या गोष्टी करा. 
पहिली म्हणजे त्वरित वनविभागाला कळवा 

आणि 

दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे बिबट्याला जायला मार्ग मोकळा करून द्या. 

बिबट्या शहरात दिसला की लोकांमध्ये उत्सुकता जागी होते. तेही स्वाभाविक मानले पाहिजे. लोक जिथे बिबट्या असेल तिथे खूप गर्दी करतात. 

आरडाओरड करतात. मोबाईलमध्ये फोटो काढतात. लगेच समाजमाध्यमांवर टाकतात. पण त्यामुळे परिसरात खळबळ निर्माण होते. त्यामुळे गर्दी अजूनच वाढू शकते. गर्दीमुळे अनेक तोटे होतात.
बिबट्या अजुनच घाबरतो-बिथरतो. तिथून पळून जायचा प्रयत्न करतो. पण गर्दीमुळे त्याला रस्ता सापडत नाही. 

या सगळ्या गोंधळात तो आणि माणसांमध्ये संघर्ष निर्माण होऊ शकतो. काही घटनांमध्ये काही अतिउत्साही लोक स्वतःच जाळ्या घेऊन बिबट्याला पकडायचा प्रयत्न करतात. 


पण लक्षात घ्या बिबट्याला पकडणे हे वनखात्याचे काम आहे. पण अनेकदा गर्दीमुळे त्यांना त्यांचे काम करता येणे मुश्किल होते. बिबट्या तुम्हाला पहिल्यांदा दिसला असला तरी त्याने त्याआधी तुम्हाला दहावेळा तरी पाहिलेले असते असे म्हंटले जाते.
तेव्हा बिबट्या आला तरी आपल्या उत्सुकतेला आळा घाला. गर्दी करू नका. बिबट्याला जायला मार्ग मोकळा ठेवा.


 वनखात्याला त्यांचे काम शांतपणे करू द्या. असे प्रसंग खूप संवेदनशीलतेने हाताळायचे असतात. जंगल कमी कमी होत आहे. आपण त्यांच्या जागेवर राहात आहोत. 


तुम्ही बिबट्याला शिकवू शकत नाही पण मानवाला शिकवू शकता. त्यामुळे आपल्याला बिबट्यांबरोबर राहायला शिकावे लागणार आहे. हे कधीच विसरू नका.