तेव्हा अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी मुख्यमंत्र्यांना (CM) आठ दिवसात तीन पत्र पाठवले. सोमवार दि. 14 फेब्रुवारीपासुन यादवबाबा मंदीरात अंदोलनाचा (Movement) निर्णय जाहीर केला होता. अण्णा हजारेंनी अंदोलनाचे हत्यार उपसल्यावर सरकारी पातळीवर हालचाली जोरात झाल्या. शनिवारी दुपारी पोलिस उपमहानिरिक्षक बी.जी.शेखर पाटील (Deputy Inspector General of Police BG Shekhar Patil) व वरीष्ठ भेटीला आले होते. शनिवारी रात्री उशीरा राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंग (Principal Secretary, Excise Department, Valsa Nair Singh) यांनी अण्णांची मनधरनी करत काही नव्या सुधारणा सांगितल्या व आंदोलन न करण्याची विनंती केली. यावेळी अण्णांनी उद्या ग्रांमसभेत निर्णय घेऊ असे सांगितले होते. त्याप्रमाणे रविवारी सकाळी यादवबाबा मंदीराच्या प्रांगणात ग्रामसभा होऊन ग्रास्थांच्या आग्रहखातीर सोमवारपासूनचे आंदोलन स्थगित केले.
राळेगणसिद्धी (Raleganasiddhi) परिवाराने 45 वर्षापूर्वी गावातील दारुभट्ट्या बंद केल्या. तसेच संपूर्ण गाव दारुमुक्त करून व्यसनाधीनतेच्या विरोधात जनजागृती सुरू केली होती. त्यानंतर 1995 पासून भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचा दारू आणि व्यसनाधीनतेला नेहमीच कडाडून विरोध राहिलेला आहे. या विषयावर अनेक आंदोलनेही झालेली आहेत. त्या आंदोलनातून महिलांच्या ग्रामसभेद्वारे दारुबंदीचा कायदा, ग्रामरक्षक दलाचा कायदा अस्तित्वात आलेला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, उत्पादन शुल्क विभागाचे सहआयुक्त, उपायुक्त, नगरचे जिल्हाधिकारी व इतर वरिष्ठ अधिकारी चर्चेसाठी आले. सुमारे अडीच तास सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.
चर्चेअंती या बैठकीत खालील निर्णय घेण्यात आले.
1) किराणा दुकानातून दारूची विक्री करण्यात येणार नाही.
2) वाईन विक्रीच्या नवीन धोरणाचा निर्णय जनतेला विचारून घेण्यात येईल.
3) वाईन विक्रीच्या प्रस्तावित धोरणाच्या निर्णयाला माध्यमांद्वारे व्यापक प्रसिद्धी देऊन त्यावर जनतेच्या सूचना व हरकती मागविण्यात येतील.
4) जनतेच्या सूचना व हरकती मागविण्यासाठी 90 दिवसांचा कालावधी देण्यात येईल.
5) नागरिकांच्या सूचना व हरकती आल्यानंतर सरकारकडून त्या विचारात घेऊन यासंबंधी अंतिम निर्णय घेण्यात येईल.