लता मंगेशकर यांचा शेवटचा Video,अशी सुरु होती कोविडशी झुंज !



सम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं रविवारी सकाळी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झालं. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर काल संध्याकाळी मुंबईच्या शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

गेल्या अनेक दिवसांपासून लतादीदी आजारी होत्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याच दरम्यान लता मंगेशकर यांचा शेवटचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये लतादीदी कोणाचा तरी आधार घेऊन चालताना दिसत आहेत.
हा व्हिडीओ तेव्हाचा आहे, जेव्हा त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्याचवेळी, या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येतं आहे की त्यांची प्रकृती इतकी वाईट आहे की ती आधाराशिवाय चालू शकत नाही. दोन महिलांनी लता मंगेशकर यांना पकडलं असून त्या हळू चालत असल्याचंही व्हिडिओमध्ये दिसत आहे.

भारतरत्न लता मंगेशकर अनंतात विलीन
लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर काल संध्याकाळी मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लतादीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी शिवाजी पार्क परिसरात हजारोंचा जनसागर लोटला होता. प्रचंड शोकाकुल वातावरणात साश्रू नयनांनी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून यावेळी लतादीदींना पुष्पचक्र अर्पन करण्यात आलं. त्यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर, आमदार सुनील प्रभू आदींनी देखील लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली.


लतादीदी 92 वर्षांच्या होत्या. लतादीदी यांच्या पार्थिवावर रविवारी संध्याकाळी मुंबईच्या शिवाजी पार्कात अंत्यसंस्कार करण्यात आले. लतादीदी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: शिवाजी पार्कात उपस्थित राहून लतादीदींना अखेरचा निरोप दिला. नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनस अध्यक्ष राज ठाकरे, अभिनेता शाहरुख खान, ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर, सिनेदिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्यासह अनेक दिग्गज आज अंत्यविधीसाठी शिवाजी पार्कात उपस्थित होते