यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाला माहिती देऊन कळविले असल्याची माहिती साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानायत यांनी दिली.
दरम्यान जगप्रसिद्ध साईमंदिरात देश-विदेशातून करोडो भाविक नतमस्तक होण्यासाठी शिर्डीत साई दरबारी हजेरी लावत असतात. साईबाबांवरील अपार श्रद्धेपोटी बाबांच्या दानपेटीत भाविक आपापल्या इच्छेनुसार भरभरून दान टाकतात. यामध्ये सोने-चांदी रोख रक्कम नाणी तसेच मौल्यवान वस्तूंचाही समावेश असतो.
दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी नोटबंदीचा ऐतिहासिक निर्णय घेऊन अनेकांना धक्का दिला होता. यामध्ये १ हजार रुपयांच्या तसेच पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून थेट बाद करण्यात आल्या होत्या.
तेव्हापासून म्हणजे साधारणपणे पाच वर्षात साई संस्थानच्या दानपेटीत हळूहळू अज्ञात भाविकांनी १ हजार रुपये व ५०० रुपयांच्या बाद झालेल्या नोटा दानपेटीत जमा केल्या आहे.
हा आकडा आता कोट्यवधी रुपयांचा घरात जाऊन पोहोचला आहे. सदरची बाब गांभीर्याने घेऊन गृहमंत्रालयाने साईसंस्थानबरोबर सातत्याने संपर्क साधून याविषयीचे अधिकार आरबीआयकडे असल्याचे लेखी पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.