TRACTOR THEFT भररस्त्यात बोलेरो आडवी लावून चक्क ट्रॅक्टर चोरून नेला - येसगाव परिसरातील घटनेने खळबळ



चार चोरट्यांनी  नगर मनमाड रोड हायवे ( Nagar Manmad Highway) जवळ येसगाव ता. कोपरगाव  (Yesgaon Kopargaon)येथे ट्रॅक्टर चालकास दमदाटी करून बळजबरीने त्याच्या ताब्यातील मोबाईल फोन व ट्रॅक्टर असा एकूण ५,५१००० रुपये चा मुद्देमाल लुटून नेल्याची  घटना दि ११ फेब्रुवारी रोजी दुपारी ५ वाजेच्या सुमारास येसगाव येथे घडली.
त्यामुळे खळबळ उडाली आहे.

 त्याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली. Kopargaon Police Station


नेमके काय घडले - 

 बाबासाहेब सीताराम आहेर राहणार रास्त सुरेगाव तालुका येवला Rasta Suregaon येथील रहिवाशी यांनी कोपरगाव तालुका ग्रामीण पोलिस स्टेशन मध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवार दि ११ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास मी कोपरगाव वरून गवंडगाव तालुका येवला येथे सोलीस कंपनीचा ट्रॅक्टर जुगाड सह ऊस आणण्यासाठी जात असताना पांढऱ्या रंगाच्या बोलेरो गाडीतील Bolero चार अनोळखी चोरट्यांनी माझ्या ट्रॅक्टरला बोलेरो गाडी आडवी लावून दमदाटी करून माझ्या ताब्यातील ५,५०,०००/- रुपये किमतीचा लाल रंगाचा सोलीस कंपनीचा ट्रॅक्टर व त्याला जोडलेले जुगाड 


तसेच एक हजार रुपये किमतीचा काळ्या रंगाचा जिओ कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण ५,५१,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेला असल्याची फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.


 त्यानुसार रजि.नंबर ४५/२०२२ भांदवी कलम ३९२,३४१,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड हे करत आहेत.