लतीदीदींचा आवाज ऐकल्यानंतर प्रत्येकाचे मन शांत होऊन जात होतं. त्यांचा आवज हा फक्त आपल्या कानाला नाही तर आपल्या मनाला तृप्त करायचा. पण तुम्हाला माहित आहे का? पाकिस्तानने ऑल इंडिया रेडिओला पत्र लिहित भारत काश्मिर ठेवू शकतो पण त्या बदल्यात आम्हाला लता मंगेशकर पाहिजे असे म्हटले होते.
लता मंगेशकर यांच्या चाहत्यांमध्ये सर्वसामान्यच नव्हे, तर अनेक दिग्गजांचाही समावेश आहे. लतादीदी यांचे पाकिस्तानमध्येही चाहते आहेत.
पाकिस्तानी जनतेसाठी लतादीदी किती महत्त्वाच्या होत्या हे आपल्याला या पत्रावरून तर दिसून आले आहे. भारतात राहूनही त्यांना पाकिस्तानी लोकांच्या मनावर राज्य केलं.
काल लतादीदींच्या निधनानंतर पाकिस्तान जनतेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. लतादीदींनी त्यांच्या करिअरमध्ये ३० हजार पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९४२ मध्ये होती आणि त्यांची कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून होती. काल लतादीदींवर मुंबईतील दादर परिसरात असलेल्याशिवाजी पार्क इथे अंत्यसंस्कार करण्यात आले