कोपरगाव येथील न्यायालय इमारतीसाठी ३८ कोटी निधी मिळविल्यानंतर न्यायाधीशांच्या निवासस्थानासाठी देखील निधी मिळावा यासाठी करीत असलेल्या पाठपुराव्याची दखल घेवून विधी व न्याय विभागाने दिवाणी न्यायाधीशांच्या निवासस्थानासाठी १ कोटी ६६ लाख १७ हजार रुपये खर्चास प्रशासकीय मंजुरी दिली असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव शहरातील न्यायालयीन इमारतींची दुरावस्था झाल्यामुळे न्यायदान प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे न्यायालयीन इमारतीच्या नूतनीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्याबाबत वकील संघाच्या सदस्यांनी ना. आशुतोष काळे यांच्याकडे न्यायालयीन इमारतीच्या नूतनीकरणाची मागणी केली होती. त्या मागणीची दखल घेवून ना. आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे न्यायालयीन इमारतीसाठी निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करून मागील महिन्यात दिवाणी न्यायालय इमारतीसाठी विधी व न्याय विभागाकडून ३८ कोटी ६३ लाख ४९ हजार रुपये निधी मिळविला होता. त्याच वेळी न्यायालयीन इमारतीबरोबरच न्यायाधीशांच्या निवासस्थानाचा देखील प्रश्न मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असल्यामुळे न्यायाधीशांच्या निवासस्थानासाठी देखील निधी मिळावा यासाठी ना. आशुतोष काळे यांनी प्रस्ताव दाखल केलेला होता व त्याबाबत त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता.
त्या पाठपुराव्याची विधी व न्याय विभागाने तातडीने दखल घेवून न्यायाधीशांच्या निवासस्थानासाठी १ कोटी ६६ लाख १७ हजार रुपये खर्चास प्रशासकीय मंजुरी दिली आहे.
कोपरगाव येथील दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) निवासस्थान इमारत बांधकामासाठी १ कोटी ६६ लक्ष १७ हजार रुपये निधी मंजूर केल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे मनःपुर्वक आभार ! @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @iAditiTatkare#AshutoshKale #Kopargaon pic.twitter.com/hcsUMarAvy
— Ashutosh Kale (@AshutoshAKale) January 22, 2022