सरपंच संदीप देवकर, शेतकरी रंजनाताई आढाव यांनी याबाबत स्वच्छतादूत सुशांत घोडके यांना फोनवरून माहिती देताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत कोपरगाव नगरपरिषद (Kopargav Municipal Council) व संजीवनी सहकारी साखर कारखाना (Sanjeevani Cooperative Sugar Factory) यांचे अग्निशमन यंत्रणेस अवगत केले. तोपर्यंत आगीचा फैलाव रोखण्यासाठी शेतकर्यांनी धाडस दाखवत उसाचे हिरवे पाचट तोडून बांधावरील पेटलेले गवतावर आपटत ते विझवले. त्यामुळे बांधापलीकडील आगीचा फैलाव थांबला.
तोपर्यंत कोपरगाव नगरपरिषद (Kopargav Municipal Council) व संजीवनीचे अग्निशमन बंब (Fire Bomb) यांनी घटनास्थळी पोहचत एका तासात आग आटोक्यात आणली. त्यामुळे आजुबाजूला असलेला ऊस (Sugarcane) व फळबागा (Orchard) वाचल्या. या आगीत भास्कर खंडीझोड यांचा तीन एकर व कैलास जाधव यांचा दोन एकर ऊस खाक झाला.
येथे वीज वितरण कंपनी अधिकारी यांनी पोहचून घटनेचा पंचनामा केला आहे. काही महिन्यांपूर्वी परिसरातील शेतकर्यांनी सदर वीज तारा व कंडक्टर जुन्या झाल्याने बदलण्यात यावा. अशी मागणी लेखी स्वरुपात केली होती. मात्र वीज वितरण विभागाने दुर्लक्ष केल्याने सदर घटना घडली असल्याचे शेतकर्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांकडून फक्त वीजबिल वसुली महावितरणला जमते परंतू सुविधांच्या नावाखाली शेतकऱ्यांना काहीच मिळत नाही.