Tips to save battery life -स्मार्टफोनची बॅटरी वाचविण्याच्या भन्नाट टिप्स


📲 देशातील जवळपास सर्व टेलिकॉम कंपन्यांनी 5G चे जाळे पसरवण्यास सुरुवात केली आहे. काही शहरांत काही कंपन्यांकडून 5G दाखल देखील झाले आहे. अशात आता हळहळू देशभरात हे नेटवर्क उपलब्ध होत आहे. यामुळे 4G सोबतच 5G नेटवर्कला सपोर्ट करणारे नवनवीन स्मार्टफोन देखील बाजारात येत आहेत. 

📶 जर तुम्ही 5G सपोर्ट करणारा स्मार्टफोन वापरत असाल तर 
देशातील अनेक टेलिकॉम कंपन्यांनी नेटवर्क सुविधा पुरविण्यास अनेक शहरांमध्ये सुरूवात केली आहे.




 एअरटेल आणि जिओने 5G सेवा काही शहरांमध्ये रोल आऊट केली आहे. पुढच्या वर्षाच्या अखेरीपर्यंत संपूर्ण देशात 5G सेवा उपलब्ध होईल अशी माहीती आहे. पण मग फक्त 5G वापरत असताना बॅटरी पटकन खर्च होऊन चार्जिंग संपेल, यासाठी काय करायचं वाचा टिप्स..
If you are using a smartphone that supports 5G
Many telecom companies in the country have started providing network facilities in many cities. Airtel and Jio have rolled out 5G services in some cities.

🧐 अँड्रॉइड फोनमध्ये 5G नेटवर्क वापरताना...

📱 अँड्रॉइड स्मार्टफोनमधील बॅटरी वाचवण्यासाठी तुम्हाला सेटिंग मध्ये जाऊन मोबाईल नेटवर्क सेटिंग ओपन करावी लागेल. यानंतर तुम्ही नेटवर्क (4जी किंवा 5जी) पर्याय निवडू शकता.



 हा पर्याय निवडल्याने तुम्हाला ज्या ठिकाणी 4G नेटवर्क असेल त्या ठिकाणी 4G आणि जिथे 5G नेटवर्क असेल तिथे 5G नेटवर्क तुम्ही वापरू शकता. हे केल्यास जेव्हा जेव्हा 4G नेटवर्कला तुम्ही कनेक्ट व्हाल तेव्हा बॅटरी जास्त वेळ जाईल आणि 5G नेटवर्कला कनेक्ट झालात तर बॅटरी लवकर खर्च होईल.

📳 जर तुमच्याकडे आयफोन असेल तर त्याच्या सेटिंगमध्ये जाऊन मोबाईल डेटा पर्याय निवडून त्यात ‘व्हॉइस अँड डेटा’ पर्याय निवडा. त्यामध्ये तुम्हाला ‘5G’ ऑटो असा पर्याय दिसेल.



 हा पर्याय तुम्ही निवडला की, तो ऑटो मोडवर असल्याने तुम्हाला 4G नेटवर्क उपलब्ध असलेल्या ठिकाणी 4G आणि 5G असलेल्या ठिकाणी 5G नेटवर्क आपोआप वापरता येईल. असे केल्याने सतत 5G नेटवर्क वापरून खर्च होणार बॅटरी दीर्घ काळ टिकेल.