राहुरी तालुक्यातील (Rahuri Taluka) पिंप्री-वळण (Pimpari -Valan) येथील मुळा नदीपात्रात (Mula River) पोहोण्यासाठी गेलेल्या 35 वर्षीय इसमाचा पाण्यात बुडून मृत्यू (Death by Drowning) झाला. अनिल दिगंबर जाधव असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे वळण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सोमवारी दुपारच्या दरम्यान वळण मुळा नदीपात्रात (Mula River) हा इसम पोहोण्यासाठी गेला असता पाण्याच्या अंदाज न आल्याने तो बुडू लागला. तेथील धुणे धुणार्या महिलांनी बघितले असता त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. मात्र, तोपर्यंत त्याचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच स्थानिकांनी नदीपात्राकडे धाव घेत मृतदेह बाहेर काढला आहे