बाबासाहेब आहेर हे सुरेगाव तालुका येवला येथील रहिवासी असून त्यांचा ट्रॅक्टरच्या सहाय्याने ऊस वाहतुकीचा व्यवसाय आहे.
दि.११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ०५ वाजेच्या सुमारास नगर-मनमाड महामार्गावर येसगाव जवळ सदर ट्रॅक्टर जात असताना महिंद्रा बोलेरो गाडीतून आलेले संशयित चार आरोपी यांनी आपली गाडी ट्रॅक्टरला आडवी घालून ट्रॅक्टर आडवून दमदाटी देऊन मोबाईल सह फिर्यादीच्या मालकीचा ५.५१ लाख रुपये किमतीचा लाल रंगाचा सोलीस या कम्पणीचा जुगडासह ट्रॅक्टर,व एक भ्रमणध्वनिसह चार अज्ञातच चोरट्यानी कोपरगाव तालुक्यातील येसगाव ग्रामपंचायत हद्दीतील नगर-मनमाड महामार्गावरून पळवून नेला होता.
त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केला होता.या भर रस्त्यात घडलेल्या गुन्ह्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण केले होते.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी या चोरट्यांना पकडण्याचे आव्हान स्वीकारले होते. व तातडीने तपास सुरु केला होता.व चोरट्यांच्या संशयावरून व फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीनुसार तपास सुरु केला असता त्यांनी अवघ्या ४८ तासात पहिला आरोपी पंडित भीमराव वाघ रा.ममदापुर ह.मु.न्हावरा कारखाना ता.शिरूर जि.पुणे यास जेरबंद केला आहे. त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.