A case has been registered against the accused Sheikh Dastgir Isak of Savlivihir in Rahata taluka for allegedly identifying her as a resident of Kopargaon taluka police station limits and repeatedly calling her on her mobile phone and demanding sexual favours.
आपदग्रस्त महिलेने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की,
”आपली साधारण दिड वर्षा पूर्वी आरोपीशी ओळख झाली होती.त्याचा गैरफायदा घेत आरोपीने आपल्याला वारंवार मोबाईलवरून फोन करून,”तू,मला फार आवडते” असे म्हणून सदर फिर्यादी महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली आहे.
व तिचा वांरवार पाठलाग करून तशी मागणी केली आहे.
तसेच फिर्यादी व फिर्यादी महिलेच्या पतीच्या भ्रमणध्वनीवर वारंवार फोन करून अश्लील भाषेत संभाषण करून घाण-घाण शिवीगाळ करून बदनामी करण्याची धमकी दिली आहे.
दि.१९ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता त्या घटनेची पुनरावृत्ती घडली आहे.
त्यामुळे संतापून सदर महिलेने तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन या प्रकरणी आरोपी दस्तगिर शेख याचे विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान या प्रकरणी फिर्यादी महिलेने आरोपी विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.१३/२०२४ भा.द.वि.कलम ३५४(अ) ३५४(ड)५०४,५०६,५०७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.