नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरातील एका मोठ्या राजकीय पक्षाचा पदाधिकारी असलेल्या भरत उदयसिंह परदेशी यांने मोठमोठे राजकीय नेत्यांचे फोटो दाखवत व ओळख करून देत मोठ्या कामाचे कॉन्ट्रॅक्ट मिळून देतो असे आमिष दाखवून कोपरगाव शहरातील भावेश रामचंद्र थोरात या युवकाची तब्बल १ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक केली असून कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला तसा गुन्हा दाखल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव येथील रहिवासी 'भावेश थोरात यांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मालेगाव येथील आरोपी भरत परदेशी याची साधारणपणे २०१८-१९ साली मित्रामार्फत ओळख झाली असता त्यानंतर भरत परदेशीने मला वेगवेगळ्या राजकीय नेत्यांची
ओळख असल्याचे सांगत मोठा व्यवसायिक असल्याचे भासवून पूर्णपणे विश्वासात घेत सर्वप्रथम २०१९ मध्ये पुणे शहरातील हवेली तालुक्यातील नळाला पाणी मीटर लावण्याचे कॉन्ट्रॅक्ट एल.एन. टी कंपनी मार्फत घेऊन देतो असे सांगत त्याकरता २० लाख रुपयांची मागणी केली असता मी त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळेल या आशेने माझ्या बँक खात्यातून टप्याटप्याने २२ लाख ४५ हजार रुपये ट्रान्सफर केले. परंतु त्यानंतर आठ दिवस होऊन गेले तरी देखील कॉन्ट्रॅक्ट मिळालेले नाही याची विचारणा करण्यासाठी मी त्याला फोन केला असता त्याने फोन उचले नाही किंवा उचलले तर उडवाउडवीचे उत्तरे दिली.
त्यानंतर पुन्हा परदेशी याने पुन्हा मला विश्वासात घेऊन असेच खोटे नाटे आश्वासन देत विशाखापट्टणम येथे कलरच्या कामासाठी ८ लाख रुपये, गावोगावी स्ट्रीट लाईट बसवण्याचे कॉन्ट्रॅक्ट रुपये, ६ नोव्हेंबर २०२० रोजी झालेल्या करारानुसार राज्यातील अनेक जिल्ह्यात स्ट्रीट लाईट बसवण्याचे कॉन्ट्रॅक्ट वर्कऑर्डर देण्याच्या नावाखाली १७ लाख रुपये, केंद्र सरकारचे बनावट कागदपत्रे तयार करून राज्यातील जिल्ह्यातील प्रत्येक गावात रेशन कार्ड बनवण्याचे देतो या रुपये, २० रोजी हायवे बसवून त्यावर बसविण्याकरिता लाख ८५ हजार कॅमेरा, बोल्ट व त्याप्रमाणे करारनामा त्या बदल्यात लाख रुपये लक्षात आले यांने दिलेले रकमेच्या आहेतच परंतु तसे काम देखील
देतो या नावाखाली ३० लाख
कॉन्ट्रॅक्ट मिळून नावाखाली ४० लाख ऑगस्ट २०२० रस्त्यावर पोल सीसीटीव्ही कॅमेरे २ कोटी ८६ ८०० रुपयांचे आदि साहित्य दिले त्याचे बिल व तसा देखील लिहून देत माझा कडून ५० घेतल्यानंतर माझा की आरोपी परदेशी सामान हे बिलाच्या किंमतीनुसार कमी आले करारनाम्या नुसार मिळालेले नाही व ते सर्व सामान तसेच पडून
राहिले. व्यवहाराचा पहिला टप्पा फसल्यापासूनच फिर्यादी थोरात यांना आपली फसवणूक होत आहे हे लक्षात येत होते परंतु आरोपी भरत परदेशी याने वेगवेगळ्या राजकीय नेत्यांची ओळख दाखवून खोटी कागदपत्रे दाखवत आरोपीचा विश्वास संपादन करत होता व आरोपी थोरात यात हळूहळू पुरते अडकत आहे हे लक्षात येऊन देखील थोरात हे मागील पैसे मिळतील या आशेने फिर्यादीच्या खोट्या आश्वासनाला बळी पडत
टप्प्याटप्प्याने आरोपी परदेशी याने फिर्यादी थोरात यांचाकडून तब्बल १ कोटी ४० लाख रुपये उकळत मोठी फसवणूक केल्याने नगर- नाशिक जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे तर राज्यातील किती लोकांना या मालेगाव येथील भरत परदेशी नावाच्या ठगाने फसविले आहे याचा शोध कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे करत आहे.