कार्यालयासमोर अंगावर राॅकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने पालीका कार्यालयात एकच खळबळ उडाली. नागरीकांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला.
या घटनेची अधिक माहीती अशी कि, माजी सैनिक दिवाकर सयाजी मकासरे वय ७४ वर्ष गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील
लिंबारा मैदान येथे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांच्या शेजारी राहणाऱ्यांचे सांडपाणी व इतर बाबींचा ञास होत असल्याची तक्रार पालीकेकडे केली होती.
अनेकवेळा तक्रार करूनही पालीका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा राग मनात धरुन सोमवारी दुपारी दिवाकर मकासरे यांनी राॅकेलचा डबा घेवून पालीकेच्या कार्यालया समोर जावून
अंगावर राॅकेल ओतुन स्वतः ला पेटवून घेण्याचा प्रयत्न करीत होते माञ जवळच असलेल्या काही दक्ष नागरीकांनी मकासरे यांना कवटाळून त्यांच्या हातातील ज्वलनशील पदार्थ व इतर साहीत्य काढुन घेवून त्यांना शांत केल्याने मोठा अनर्थ टळला.
या घटने बाबत बोलताना दिवाकर मकासरे म्हणाले की, मी तब्बल १७ वर्ष भारतीय सैन्यदलात राहुन देश सेवा केली आहे.१९७१ च्या पाकिस्तान विरुद्धच्या लढाईत देशाची सेवा केलेली आहे मात्र
सेवानिवृत्त झाल्यानंतर कोपरगाव शहरातील लिंबारा मैदान येथे राहतात असताना, शेजाऱ्याच्या अतिक्रमणाचा मला त्रास होतोय. सन २०१६ पासून पालिकेचे मुख्याधिकारी ते जिल्हाधिकारी यांच्या पर्यंत मी स्वतः लेखी तक्रार करुन सुद्धा प्रशासन गांभिर्याने दखल घेत नसल्याने अखेर मला आज हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचे मकासरे यांनी म्हटले आहे.
या घटने बाबत पालीकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी म्हणाले की, दिवाकर मकासरे यांची पालीकेकडे अनेक दिवसांपासून त्रास
असुन त्यांनी ज्यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यांना पालीकेच्यावतीने अतिक्रमण काढण्यासह शेजाऱ्यांना ञास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचना दिल्या आहेत.
लिंबारा मैदान येथे दोघांचेही अतिक्रमण असल्याने दोघांना नोटीसा दिल्या असल्याचे सांगितले. दरम्यान मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी
अतिक्रमण असलेल्या जागेची प्रत्यक्ष जावून पहाणी केली असुन पुढील कारवाई सुरु केली आहे. अतिक्रमणावरून माजी सैनिकांने टोकाचे पाऊल उचलल्याने शहरात चर्चेचा विषय झाला