💳 सध्या प्रत्येक ठिकाणी आधार कार्डचा वापर केला जातो. मात्र, त्या माध्यमातून फसवणूकीचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे आधार कार्ड वापरताना काळजीही घेतली पाहिजे. याबाबत 'यूआयडीएआय'कडून महत्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
✅ अशी घ्या खबरदारी..!
▪️ ओळखीचा पुरावा म्हणून बँक खाते, पॅन कार्ड, तसेच पासपोर्टसह इतर कोणत्याही दस्तावेजांच्या वापराबाबत जशी खबरदारी बाळगतो, तशीच खबरदारी आधार कार्डच्या वापराबाबतही बाळगा.
▪️ आधार क्रमांक वापरल्यानंतर मोबाईलवर प्राप्त होणाऱ्या आधार-ओटीपीची माहिती इतर कोणालाही देऊ नका. शिवाय एम-आधारचा पिन नंबरही इतरांसोबत शेअर करू नका
▪️ आधार कार्डची झेरॉक्स किंवा त्याची प्रत कोठेही ठेवू नका. बरोबरच आपले आधार कार्ड सोशल मीडियावर शेअर करू नका.
▪️ आधार कार्डचा अनधिकृत वापर होत असल्याचे आढळल्यास, 1947 या क्रमांकावर फोन करुन माहिती द्या. तसेच help@uidai.gov.in यावर ई-मेल करूनही तक्रार देता येईल.