Whatsapp Premium मध्ये बिझनेस अकाउंट्सना मिळणार ‘हा’ फायदा; कसे वापरायचे जाणून घ्या

व्हॉटसअ‍ॅप हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. युजर्सना आकर्षित करण्यासाठी यावर सतत नवे फीचर्स लाँच केले जातात. आता व्हॉटसअ‍ॅपकडुन नवे सब्सक्रीप्शन प्लॅन लाँच करण्यात आले आहे. या फीचरमध्ये व्हॉटसअ‍ॅपवरील बिझनेस अकाउंट वापरणाऱ्यांसाठी एक सब्सक्रीप्शन प्लॅन सादर करण्यात येणार आहे.

व्हॉटसअ‍ॅप प्रिमिअमबाबत एक नव्या अपडेट देण्यात आले आहे. हे फीचर त्या बिझनेस अकाउंट्ससाठी उपलब्ध होणार आहे ज्यांनी प्ले स्टोअर आणि टेस्ट फ्लाइटवर उपलब्ध असणाऱ्या अँड्रॉइड आणि आयओएस अ‍ॅपचे लेटेस्ट बीटा वर्जन डाउनलोड केले आहे.

आणखी वाचा : रोज सहा तासांसाठी मिळणार फ्री अनलिमिटेड इंटरनेट! वोडाफोनच्या आकर्षक रिचार्ज प्लॅनची किंमत जाणून घ्या

ऑप्शनल सब्सक्रीप्शन प्लॅन मिळेल

  • ‘वीबेटइन्फो’ या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार व्हॉटसअ‍ॅप प्रिमियम काही बिझनेस अकाउंटसाठी एक ऑप्शनल प्रिमियम प्लॅन असेल.
  • सेटिंग्स पर्यायामध्ये जाऊन तुम्ही हे फीचर वापरण्यास सुरूवात करू शकता.
  • जर सेटिंग्समध्ये तुम्हाला ‘व्हॉटसअ‍ॅप प्रिमिअम’ हे नवे सेक्शन दिसत असेल, तर याचा अर्थ हे फीचर तुमच्यासाठी उपलब्ध झाले आहे.

व्हॉटसअ‍ॅप प्रिमियममधील विशेष आकर्षण

  • यामध्ये एक युनिक शॉर्ट लिंक तयार होईल ज्याच्या मदतीने ग्राहक थेट बिझनेस अकाउंट्सबरोबर संपर्क साधू शकतील.
  • व्हॉटसअ‍ॅप प्रिमियममध्ये समाविष्ट होणाऱ्या बिझनेस अकाउंट्सना १० डिवाइसबरोबर कनेक्ट करता येईल.
  • एकाच अकाउंटवरून जास्तीत जास्त ग्राहकांशी संपर्क साधता येणार असल्याने चॅट्स मॅनेज करणे सोप्पे होईल.
  • व्हॉटसअ‍ॅप प्रिमिअम युजर्स या लिंकला दर ९० दिवसांनी बदलू शकतील.
  • व्हॉटसअ‍ॅप प्रिमिअम हा एक ऑप्शनल प्लॅन आहे आणि यास कधीही अनसब्सक्राइब करता येऊ शकते.
  • हे फीचर फक्त बिझनेस अकाउंट्ससाठी उपलब्ध आहे.