Yeola Paithani - पैठणी घेण्यास आल्या आणि 70 हजारांच्या साड्यांवर डल्ला मारून गेल्या

शिर्डी नजीक असलेल्या सावळीविहीर फाटा येथील वृंदावन येवला पैठणी या दुकानामधून 3अनोळखी महिलांनी  न पैठणी साड्या घेण्याचा बहाणा करून सुमारे 69 हजार रुपयांच्या चार साड्या चोरून नेल्याची फिर्याद शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने  दुकानदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.



यावेळी फिर्यादी मध्ये 
मी ऋषीकेश गणपत ठोबरे वय- 29 वर्ष धंदा कापड दुकान व्यवसाय 

रा पुरणगाव जळगाव नेऊर ता- येवला
जि-नाशिक यांनी दिलेल्या फिर्यादित म्हण्टले आहे की,


मी वरील ठिकाणी माझे कुटुंबासह राहणएस असुन माझे सावळिविहीर फाटा
इंडीयन पेट्रोलपंपाशेजारी वृंदावन येवला पैठणी नावाचे दुकान असुन ते मी चालवतो व त्यावर माझे
कुटुंबाची उपजिवीका भागवतो. तसेच माझे दुकानात विनायक जगताप रा-जेऊर कुंभारी ता-कोपरगाव
व रोहीत जगताप रा आडगाव रेपाळ ता. येवला असे दोन कामगार कामास आहेत मी दररोज
पुरणगाव येथुन अपडाऊन करतो व दुकानाच्या चाव्या माझे कामगार यांचेकडे ठेवत असतो.


दि 09/09/2022 रोजी सकाळी नेहमी प्रमाणे 09/00 वा.चे सुमा माझा कामगार विनायक
जगताप याने दुकान उघडले तेव्हा 11/30 वा. चे सुमा तिन अनोळखी महीला (नाव गाव माहीत
नाही) माझे दुकानात पैठणी साड्या घेण्यासाठी आल्या तेव्हा मी 11/50 वा दुकानावर आलो असता
मी पाहीले की तीन महीला पैठनी घेतांना खुप गोंधळ करीत होत्या तेव्हा मी त्यांना सांगितले की




तुम्ही बाहेरच्या दालनात चला तेव्हा त्या बाहेरच्या दालनात येतांना हातात तिन साड्या घेवुन आल्या
त्या हातात आणलेल्या साड्याची किमंत 5,000रु असतांना त्या साड्या त्या तिनी महीला 500/-रु
मागू लागल्या तेव्हा मी त्यांना म्हणालो की मला साड्या 500/- रु. ला द्यायच्या नाही तेव्हा त्यांनी
हातातील साड्या टाकुन निघुन गेल्या त्या बाहेर निघुन गेल्यानंतर मी माझे दुकानातील कामगार


मुलांना साड्याचा माल चेक करण्यास सांगितले असता त्यांनी चेक करुन मला सांगितले की
दुकानात दोन ते तीन साड्या कमी वाटत आहेत तेव्हा मला संशय आल्याने मी माझे दुकानात




असलेला सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज चेक केला असता त्यामध्ये त्यांचे समोर टाकलेल्या साड्याचा
गठ्ठा मधुन एक साडी खोलून त्या साड्याच्या गठ्ठ्यावर टाकायच्या व खोललेली साडी आडवी धरुन
कामगाराना सांगायच्या की आम्हाला अजून वेगळ्या डिझाईन दाखवा तेव्हा ती गठ्ठ्यातील साडी
चिमटीत धरून मागे उभ्या असलेल्या महीलेकडे साड़ी दयायची अशा प्रकारे त्यांनी माझ्या दुकानातुन



चार साड्या चोरी झाल्याची खात्री झाल्याने आम्ही त्या महीलेचा
आजुबाजुला व परीसरात शोध
घेतला परंतु त्या महीला मिळुन आल्या नाही. त्यानंतर मी आज पावेतो सर्वत्र शोध घेतला परंतु
माझ्या दुकानातील साड्या चोरणा या तीन महीला मिळुन आल्या नाही. तेव्हा माझी खात्री झाली की




माझ्या चार साड्या त्या अनोळखी महीलानी चोरून नेल्या आहेत त्याचे वर्णन खालीलप्रमाणे: 1)
34,000/-रु.च्या दोन मुनिया ब्रॉकेट नाव असलेल्या गुलाबी रंगाच्या साड्या, 2) 25,000/- रु. की. ची
एक मोर पोपट ब्रॉकेट असलेली पिवळ्या रंगाची साडी3) 10,000/- रु. की. ची महाराणी पिवळ्या
रंगाची साडी

रूपये 69,000  येणेप्रमाणे
09/09/2022 रोजी सकाळी 11/30 वा. ते 11/50 वा दरम्यान सावळीविहीर फाटा इंडीयन पेट्रोल
पंपाशेजारी असलेल्या वृंदावन पैठणी दुकानातून तीन अनोळखी महीलांनी वरील वर्णनाच्या व
किमतीच्या साड्या माझे संमतीशिवाय लबाडीचे ईराद्याने स्वताचे फायद्याकरिता चोरून नेल्या आहे.