Health ANM सुरेगावच्या आरोग्य सेविकेच्या तत्परतेमुळे वाचले तीन जीवांचे प्राण



कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या आरोग्य सेविका व्ही एल तरुळे यांच्या कार्य तत्परतेने सुरेगाव येथील तीन निष्पाप जीवांचे प्राण वाचले असल्याने आरोग्य सेविका तरुळे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या विषयी सुरेगाव आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका तरुळे यांनी अधिक माहिती दिली की, सुरेगाव येथील मोलमजुरी करणाऱ्या आदिवासी कुटुंबातील अनिल लोखंडे यांचा १८ महिन्याचा दिपक या मुलाचे हिमोग्लोबिन अतिशय कमी झाले होते तसेच त्याला त्यातच निमोनिया या आजाराची देखील लागण झाली होती यावर त्याचे कुटुंबीयांनी स्थानिक 



डॉक्टरांकडे उपचार घेत असता त्यातील एका डॉक्टरांनी त्या मुलास प्रवरानगर येथील हॉस्पिटलला नेण्याचा सल्ला लोखंडे कुटुंबाला दिला होता परंतु ते कुटुंब प्रवरानगरला न जाता स्थानिक डॉक्टरांकडेच बरे वाटेल या हिशोबाने उपचार घेत होते ही माहिती आरोग्य सेविका तरुळे यांना



 समजताच त्यांनी तत्काळ लोखंडे यांचे घर गाठून त्यांना प्रवारानगर येथील हॉस्पिटल ला जाण्याची विनंती केली परंतु ते कुटुंब ऐकण्याच्या मनस्थिती नव्हते परंतु त्या कुटुंबास अनेक वेळा



 तरुळे यांनी विनवण्या करत अखेर त्या मुलास आरोग्य केंद्राच्या ॲम्बुलन्सने प्रवरानगर येथे दि १९ ऑगस्ट रोजी पुढील उपचार घेण्यासाठी पाठविले असता तेथील डॉक्टरानी तत्काळ त्या मुलास ऍडमिट करत



 त्याच्यावर योग्य ते उपचार करत त्या १८ महिन्याच्या बाळाला पूर्णपणे बरे करत गुरुवार दि ८ सप्टेंबर रोजी हॉस्पिटल मधून घरी सोडले व त्या बाळाला जीवनदान मिळाले.

तसेच त्याच कुटुंबातील गरोदर असलेली मीना सुनील लोखंडे या महिलेस वारंवार बीपी चा त्रास होत होता तिला देखील पुढील उपचार घेण्यासाठी वारंवार सांगून देखील ती ऐकत नव्हती परंतु मंगळवार दि ६ सप्टेंबर रोजी सदर महिला सुरेगाव आरोग्य केंद्रात लसीकरण



 सत्रासाठी आली असता तिचा बीपी तपासला असता तो कमी असल्याचे निदर्शनास आले असता सदरची बाब तिच्या कुटुंबास सांगितली व तिला पुढील उपचार घेण्यासाठी तत्काळ प्रवारानगर ला जाण्याचा सल्ला दिला परंतु ते कुटुंब तरी देखील ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते यावर आरोग्य सेविका तरुळे यांनी 



त्या कुटुंबाची कित्येक वेळ समजूत काढून त्यास पुढील उपचार घेण्यासाठी तयार झाले व ते प्रवरानगर येथील हॉस्पिटलला गेले असता तेथील डॉक्टरांनी तिला ऍडमिट करत तिच्यावर योग्य ते उपचार करत तिची सुखरूप डिलिव्हरी करत तिला 



कन्यारत्न प्राप्त झाला त्यामुळे आरोग्य सेविका तरुळे तसेच त्यांना या कामात वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या आरोग्य समुदाय अधिकारी पूजा वाबळे, अंगणवाडी सेविका प्रतिभा वाबळे तसेच अशा सेविका सुनिता सोनवणे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदन चा वर्षाव होत असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.



सुरेगाव आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या या कार्य तत्पर कामगिरीबद्दल सुरेगावचे सरपंच शशिकांत वाबळे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी तसेच माजी सरपंच सचिन कोळपे यांनी देखील अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहे.