Truecaller चा वापरकर्त्यांना दणका ! 'हे' महत्त्वाचे फीचर करणार बंद !

सर्वांचे लोकप्रिय  App Truecaller ने अलीकडेच एक मोठी घोषणा केली आहे,

ज्या अंतर्गत या App चे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य बंद  करण्यात येणार आहे. 


Truecaller  च्या टीम ने सांगितले आहे की 

की येत्या 11 मे नंतर Truecaller अ‍ॅपवरून व्हॉईस कॉल रेकॉर्ड Record Voice Calls करता येणार नाही. 


Truecaller App कडून वापरकर्त्यांना मोठा धक्का

Truecaller ने एक मोठी घोषणा केली आहे, 

Truecaller App चे वापरकर्ते 11 मे पासून अ‍ॅपद्वारे येणारे जाणारे कॉल रेकॉर्ड करू शकणार नाहीत.

 Truecaller ने म्हटले आहे की, 

आतापर्यंत कॉल रेकॉर्डिंग फीचर सर्वासाठी मोफत होते,


परंतु आता हे फीचर अ‍ॅपमधून पूर्णपणे काढून टाकले जाणार आहे. 

काय आहे कारण?

Truecaller ने अचानक असे पाऊल का उचलले? 

यामागे Google ची New Play Store Policy आहे. ज्यामध्ये , आता रिमोट कॉल ऑडिओ रेकॉर्डिंगसाठी एक्सेसिबिलिटी API ची विनंती केली जाऊ शकत नाही, 

याचा अर्थ अ‍ॅप्सना कॉल रेकॉर्डिंगसाठी परवानग्या मिळवण्याचा पर्याय नसेल.

त्यामुळे सर्व Call Recording Apps Play Store मधून काढून टाकले जाणार आहेत. 


आता कॉल कसे रेकॉर्ड करणार? 
Truecaller आणि इतर Call Recording Apps हे वैशिष्ट्य काढून टाकल्यानंतर कॉल रेकॉर्ड करणे अशक्य आहे असे तुम्हाला वाटत असले तर 


तसे नाही.


जर तुम्ही असा फोन वापरत असाल ज्या फोन मध्ये कॉल रेकॉर्ड ची सुविधा पाहिल्यापासून च आहे , 

म्हणजे inbuilt Call Recoding 

तर तुम्ही त्याचा वापर call recording साठी करू शकता...
त्यावर कुठलेही बंधन नाही.