ग्रामसुरक्षादला मुळे गावकऱ्यांनी चोरांना दाखवला हिसका

गावागावात चोरांचा प्रभाव वाढू लागला आहे हे लक्षात घेऊन पोलिसांनी वेळीच ग्रामसुरक्षा दलाची यंत्रणा बळकट करण्याचा केलेला प्रयत्न राहाता तालुक्यातील रांजणखोल येथे फायद्याचा ठरला.
दोन दिवसांपूर्वी खंडाळा येथे एकाच रात्री पाच ते सहा घरी चोरी झाली व बेलापूर येथे ही चोरीच्या घटना घडल्या आहेत. खंडाळा येथे ढोकचौळे वस्तीवर काल रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास दरोड्याच्या तयारीत असलेले चोरटेंचा डाव फसला. चोरट्यांनी त्यांचा मोर्चा रांजणखोल गावाकडे वळलला. रांजणखोल गावाचे पोलीस पाटील कृष्णा अभंग, सरपंच चांगदेव ढोकचौळे, उपसरपंच निलेश जाधव यांनी तुरंत ग्रामसुरक्षा यंत्रणेवरुन ग्रामस्थांना फोन केला. त्यानंतर रांजणखोल ग्रामस्थ सावध झाले. त्यानंतर रांजणखोल परिसरात 10 मिनिटांतच श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस रघुवीर कारखीले, श्री शेलार, साईनाथ राशिनकर हे आपल्या ताफासह हजर झाले.
त्यांनी रांजणखोल परिसरात चोरट्यांची शोध सुरु केला. पोलिस गाडी गावात असल्याने चोरट्यांनी बेलापूरकडे पळ काढल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. खंडाळा गावातुन चोर रांजणखोलकडे आल्याची सदरची माहिती पोलीस कॉन्स्टेबल रघुवीर कारखीले यांनी पोलीस पाटील कृष्णा अभंग यांना दिली. पोलीस पाटील व सरपंच चांगदेव ढोकचौळे यांनी त्वरित रांजणखोल ग्रामस्थांना सतर्क केले. ग्रामसुरक्षा दल सतर्क असल्याचा काय परिणाम होतो. याचा एक उत्तम नमुना असून गावागावातील ग्रामसुरक्षा दल आता अधिक बळकट करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.