सध्या सर्वत्र ऑनलाईन सेल्सची चर्चा सुरू आहे. या ऑनलाईन सेल्समध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर मोठी सूट देण्यात येत आहे. यामध्ये ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या अनेक ऑफर्स आहेत. अशीच एक स्मार्टफोनबाबतीतील आकर्षित करणारी ऑफर म्हणजे गूगल पिक्सेल ६ए वरील ऑफर. जर तुम्ही नवा फोन घेण्याचा विचार करत असाल तर गूगल पिक्सेलवर आकर्षक ऑफरची घोषणा करण्यात आली आहे. काय आहे ही ऑफर जाणून घेऊया.
गूगल पिक्सेल ६A वरील ऑफर
फोनचे फीचर्स
- या फोनमध्ये क्लीन युआय आणि उत्तम कॅमेरा क्वालिटी आहे. या फोनची बॅटरी लाईफ चांगली आहे, तसेच या फोनमध्ये गूगलचे लेटेस्ट सॉफ्टवेअर अपडेट सर्वात आधी मिळतील.
- फोनमध्ये ६.४ इंचचे ओएलइडी डिस्प्ले देण्यात आला आहे.
- हॅन्डसेटमध्ये गूगल टेन्सर प्रोसेसरसह उपलब्ध होतो.
- या फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजचा पर्याय देण्यात आला आहे.
- या फोनमध्ये अँड्रॉइड १३ चा ऍक्सेस मिळणार आहे.
- १२.२ एमपी आणि १२ एमपी डुअल रियर कॅमेराबरोबर येतो. तसेच यामध्ये ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.
- या फोनमध्ये ४४१० mAh ची बॅटरी उपलब्ध आहे.