पाथर्डी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या कालीचरण महाराज यांच्या समर्थनार्थ मिरी येथील हिंदू संघटनेकडून बाईक रॅली काढण्यात आली. कालीचरण महाराजांचा जयघोष करणाऱ्या घोषणा रॅलीत सहभागी झालेल्या तरुणांनी दिल्या. हातात भगवा ध्वज, तोंडवर मास्क अशा पध्दतीने रॅली पार पडली.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल एक विधान कालीचरण महाराज यांनी केले. त्याच्या समर्थनार्थ मिरी येथे हिंदू संघटनेच्या वतीने रॅली काढण्यात आली.
रॅलीची सुरुवात मिरी गावातील बाजारतळ येथून करण्यात आली. हनुमान मंदिर, बसस्टॅण्ड परिसरमार्गे जाऊन बाजारतळावर घोषणाबाजी करून रॅलीचा समारोप झाला. या रॅलीत सोमनाथ झाडे, आकाश धनवटे, किरण शेळके, अनिकेत पटारे,शुभम मोटे, बबन केरकळ,मनोज शिंदे,गौतम गवळी,अजय मरकड,सौरभ घोरपडे, रोहित गवळी सहभागी होते.