Voting Percentage - कोपरगाव तालुक्यातील 'या' गावांत विक्रमी मतदान - वाचा गाव निहाय मतदानाची टक्केवारी

 अहमदनगर जिल्ह्यातील २०३ ग्रामपंचायतींच्या थेट जनतेतून सरपंच व सदस्यपदासाठी निवडणूक मतदान प्रक्रिया रविवार दि १८ डिसेंबर २०२२ रोजी संपन्न झाली असून यात कोपरगाव तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींचा समावेश होता. 

 
यात विद्यमान आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, माजी जिल्हापरिषद सदस्य राजेश परजणे तसेच शिवसेना ठाकरे गटाची तर अनेक गावांत उभे असलेल्या अपक्ष उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 



  
कोपरगाव तालुक्यातील निवडणूक संपन्न झालेल्या २६ ग्रामपंचायती साठी एकूण ५७३१० मतदार होते तर यातील ४६८७८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावत एकूण ८१.८० टक्के मतदान झाले.  


 
गाव-भोजडे एकूण मतदार-२३२५ एकूण झालेले मतदान-१८३१ एकूण टक्केवारी-७८.७५% 



गाव-सडे एकूण मतदार-११२० एकूण झालेले मतदान-१०४६ एकूण टक्केवारी-९३.३९% 



गाव-शिंगणापूर एकूण मतदार-६८४५ एकूण झालेले मतदान-४४३० एकूण टक्केवारी-६४.७२% 


गाव-वेस सोयगाव एकूण मतदार-१८९३ एकूण झालेले मतदान-१६१३ एकूण टक्केवारी-८५.२१% 



गाव- कोळपेवाडी एकूण मतदार-४७५१ एकूण झालेले मतदान-३६८० एकूण टक्केवारी-७७.४६% 


गाव-वडगाव एकूण मतदार-११०९ एकूण झालेले मतदान-९६८ एकूण टक्केवारी-८७.२९% 



गाव-मोर्वीस एकूण मतदार-८१४ एकूण झालेले मतदान-७४८ एकूण टक्केवारी-९१.८९% 


गाव- खिर्डी गणेश एकूण मतदार-२०६५ एकूण झालेले मतदान-१७२४ एकूण टक्केवारी-८३.४९% 



गाव- पढेगाव एकूण मतदार- २३१४ एकूण झालेले मतदान-१९९२ एकूण टक्केवारी-८६.०८% 

गाव-चासनळी एकूण मतदार-२८०५ एकूण झालेले मतदान-२२५७ एकूण टक्केवारी-८०.४६% 


गाव-माहेगाव देशमुख एकूण मतदार-३४१९ एकूण झालेले मतदान-२७३१ एकूण टक्केवारी-७९.८८% 


गाव-रांजणगाव देशमुख एकूण मतदार-३२३० एकूण झालेले मतदान-२७७९ एकूण टक्केवारी-८६.०४% 


गाव-शहापूर एकूण मतदार-१०४४ एकूण झालेले मतदान-९२७ एकूण टक्केवारी-८८.७९% 


गाव-बहादराबाद एकूण मतदार-९०६ एकूण झालेले मतदान-८४१ एकूण टक्केवारी-९२.८३%

 
गाव-डाऊच बु एकूण मतदार-९८४ एकूण झालेले मतदान-८७४ एकूण टक्केवारी-८८.८२% 

गाव-डाऊच खु एकूण मतदार-१५०३ एकूण झालेले मतदान-१३७१ एकूण टक्केवारी-९१.२२% 


गाव- देर्डे कोरहाळे एकूण मतदार-१६९७ एकूण झालेले मतदान-१४१२ एकूण टक्केवारी-८३.२१% 


गाव- तळेगाव मळे एकूण मतदार-१२०६ एकूण झालेले मतदान-१०७० एकूण टक्केवारी-८८.८९% 


गाव- चांदेकसारे एकूण मतदार-३६०३ एकूण झालेले मतदान-२८४४ एकूण टक्केवारी-७८.९३% 


गाव- धारणगाव एकूण मतदार-२२९० एकूण झालेले मतदान-१९४७ एकूण टक्केवारी-८५.०२% 


गाव- हंडेवाडी एकूण मतदार-६१२ एकूण झालेले मतदान-५६१ एकूण टक्केवारी-९१.६७% 


गाव- बकतरपूर एकूण मतदार-९७९ एकूण झालेले मतदान-७८८ एकूण टक्केवारी-८०.४९% 


गाव- सोनेवाडी एकूण मतदार-३७२२ एकूण झालेले मतदान-३१३४ एकूण टक्केवारी-८४.२% 


गाव- खोपडी एकूण मतदार-१०९३ एकूण झालेले मतदान-९९३ एकूण टक्केवारी-९०.८५% 

गाव- करंजी एकूण मतदार-३२१३ एकूण झालेले मतदान-२६६५ एकूण टक्केवारी-८२.९४% 

गाव- बहादरपूर एकूण मतदार-१७६८ एकूण झालेले मतदान-१६५० एकूण टक्केवारी-९३.३३% 



दरम्यान वेस-सोयगाव शिवाय खिर्डी गणेश,(काळे,कोल्हे स्वतंत्र तर परजणे गट स्वतंत्र) वडगाव,(काळे गटाचे दोन गट त्यातील एकास परजणे गटाची साथ तर कोल्हे गट स्वतंत्र) माहेगाव देशमुख,(काळे,कोल्हे,प्रहार संघटना) करंजी (काळे,कोल्हे स्वतंत्र आणि उद्धव सेना गट) आदी ठिकाणी तिरंगी लढत झाली आहे.

या शिवाय मोठ्या असलेल्या शिंगणापूर,कोळपेवाडी,रांजणगाव देशमुख,सोनेवाडी या राजकीयदृष्टया महत्वाच्या गणल्या गेलेल्या ग्रामपंचायतीत पारंपरिक काळे-कोल्हे यांच्यात लढत रंगली होती.




 मतमोजणी २० डिसेंबर २०२२ रोजी होणार आहे.त्यामुळे आता या निवडणुकीत कोणाचे घोडे पुढे जाणार हे येत्या मंगळवारी दि.२० डिसेंबर रोजी निष्पन्न होणार आहे.त्याकडे आत मतदार आणि निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे लक्ष लागून आहे.