सांगवी भुसार येथील 26 जानेवारी च्या घटनेतील आरोपीला अटक पूर्व जामीन मंजूर

जानेवारी महिन्यात संपन्न झालेल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित झेंडा वंदन दिवशी, गुटखा खाऊन झेंडा वंदन करू नका असे म्हणल्याचा राग येऊन प्रहारचे माजी तालुकाध्यक्ष यांनी कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार येथील आरोपी उपसरपंच यांचेसह आठ जणांविरुद्ध कोपरगाव 




तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता , फिर्यादी संदीप क्षीरसागर याचे विरुद्ध तेथील शिक्षिका श्रीमती मेघा खंडांगळे यांनी सरकारी कामात अडथळा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. यात आरोपी क्षीरसागर यांनी कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने अर्ज दाखल केला होता. त्यानुसार त्यांना अटक पूर्ण जामीन मंजुर झाला असल्याची माहिती ऍड .योगेश खालकर यांनी दिली आहे.

kopargaon court



देशात २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात संपन्न झाला असताना सांगवी भुसार गाव याला अपवाद ठरले होते .त्या ठिकाणी झेंडावंदन प्रसंगी  दोन गटात वाद निर्माण झाला होता. फिर्यादी प्रहार संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष संदीप क्षीरसागर यांनी आरोपी तान्हाजी जाधव यांचेसह



 नेमक्या २६ जानेवारी रोजी सकाळी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण प्रसंगी सकाळी ९ वाजेच्या सुमारास आरोपी उपसरपंच तान्हाजी जाधव,विजय जाधव,विलास कासार जाधव,किशोर बबन जाधव,हरिभाऊ शिंदे,साहेबराव जाधव,भाऊसाहेब संपत जाधव,सुनील प्रभात बंदे यांचेसह आदींना गुटखा खाऊन झेंडा वंदन करण्यास हरकत घेतली होती.


त्यावरून फिर्यादी क्षीरसागर यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.त्यामुळे विरोधी गट दुखावला गेला होता.

दरम्यान त्यानंतर तेथिल शिक्षिका श्रीमती मेघा खंडांगळे या महिला शिक्षिकेने संदीप क्षिसागर यांचे विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणला म्हणुन गुन्हा  दाखल  केला  होता   त्यानंतर  संदीप क्षिसागर  यांनी कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालय यांचे कडे ५९/२०२३ नुसार अटक पूर्व जामीन मिळावा म्हणून अर्ज दाखल केला होता.

त्यात फिर्यादीच्या वतीने अ‍ॅड.खालकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की,”फिर्यादी यांनी या पूर्वी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अर्ज देऊन वेळोवेळी माहिती मागितली होती.त्या द्वेषातून हा गुन्हा दाखल केला आहे.जिल्हा व सत्र न्यायालयाने हा युक्तिवाद गृहीत घरून हा जामीन आरोपीस मंजूर केला आहे.सदर आदेशाने खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या अपप्रवृत्तीस चाप बसण्यास मदत होणार आहे.
दरम्यान या प्रकरणी ऍड .योगेश खालकर यांनी सामाजिक बांधिलकी पत्करून हा खटला चालवला आहे.त्यांचे या प्रकरणी कोपरगाव तालुक्यात कौतुक होत आहे.