शहरातील गोंधवणी रोड परिसरातील लक्ष्मीनारायण नगर भागात राहणार्या कीर्ती आदिनाथ मोढे (वय 19) या विद्यार्थिनीने राहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला उपचारासाठी तातडीने साखर कामगार रुग्णालयात आणले असता उपचारापूर्वीच ती मयत झाल्याचे रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर रवींद्र जगधने यांनी पोलिसांना कळविले.
त्यावरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तिने नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र समजू शकले नाही. पोलीस निरीक्षक सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पंडित अधिक तपास करीत आहेत.